प्रत्येक स्वयंपाक घरात जाड मीठ कायमच उपलब्ध असते. जाड मिठाचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासोबतच शरीरासाठी सुद्धा केला जातो. जेवणाची चव वाढवण्यासाठी जाड मीठ खूप जास्त फायदेशीर ठरते. पण जाड मीठ असो किंवा बारीक मीठ मर्यादित प्रमाणात सेवन करणेच फायदेशीर ठरेल. अतिप्रमाणात मिठाचे सेवन केल्यास रक्तदाब वाढणे, हृदयविकार आणि मूत्रपिंडांवर ताण येऊन शरीरसंबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मिठाचे सेवन मर्यादित प्रमाणात सेवन करावे. चला तर जाणून घेऊया जाड मिठाचे शरीराला होणारे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
आजीबाईच्या स्वयंपाक घरातील प्रभावी जाड मीठ! मानसिक तणाव कमी होण्यासोबतच हाडांच्या वेदनांपासून मिळेल कायमचा आराम

घशात वाढलेली खवखव, किरकोळ वेदना आणि तोंडातील स्वच्छता राखण्यासाठी कोमट पाण्यात जाड मीठ घालून गुळण्या कराव्यात. गुळण्या केल्यामुळे तोंडातील स्वच्छ कमी होते आणि वेदनांपासून आराम मिळतो.

पायांमध्ये खूप जास्त वेदना होत असतील तर गरम पाण्यात मीठ टाकून त्यात पाय बुडवून ठेवावेत. यामुळे दिवसभराचा थकवा आणि तणाव कमी होण्यास मदत होते.

स्नायूंमध्ये वाढलेले तणाव कमी करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात जाड मीठ घालावे. यामुळे स्नायूंमध्ये वाढलेल्या वेदना, हाडांमध्ये वाढलेल्या वेदना कमी होण्यास मदत होईल.

त्वचेवरील घाम व धूळ स्वच्छ करण्यासाठी मीठ फायदेशीर ठरते. त्वचेवर जखम, संसर्ग किंवा गंभीर त्वचारोग झाल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

पारंपरिक पदार्थ, लोणची किंवा फोडणीचे पदार्थ बनवण्यासाठी जाड मिठाचा वापर केला जातो. यामुळे पदार्थाची चव संतुलित राहते.






