आयसीसी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयरसाठी नामांकित खेळाडूंची यादी जाहीर झाली आहे. ज्यामध्ये चार खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये भारताचा एक, ऑस्ट्रेलियाचा एक, पाकिस्तानचा एक आणि झिम्बाब्वेचा एक खेळाडू आहे. या सर्व खेळाडूंनी T20 क्रिकेटमध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीने या वर्षात बरीच चर्चा केली आहे. 2024 हे वर्ष या चार खेळाडूंसाठी खूप चांगले राहिले आहे.
आयसीसी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयरसाठी नामांकित खेळाडू. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
टीम इंडियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचे नाव देखील आयसीसी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयरसाठी नामांकित खेळाडूंच्या यादीत समाविष्ट आहे. अर्शदीप सिंग दीर्घकाळापासून टीम इंडियासाठी T20 क्रिकेटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
झिम्बाब्वेचा स्फोटक फलंदाज सिकंदर रझासाठीही कॅलेंडर वर्ष आश्चर्यकारक ठरले. या वर्षी रझाने २४ सामन्यांत फलंदाजी करताना ५७३ धावा केल्या. ज्यामध्ये नाबाद १३३ धावांची त्याची सर्वोत्तम खेळी होती. याशिवाय रझाने गोलंदाजी करताना २४ विकेट्स घेतल्या.
२०२४ चं वर्ष ट्रॅव्हिस हेडसाठी खूप चांगले आहे. या वर्षी हेडने १५ T20 सामने खेळले, ज्यात त्याने फलंदाजी करताना ५३९ धावा केल्या. या काळात हेडची सर्वोत्तम खेळी ८० धावांची होती.
बाबर आझमने एका कॅलेंडर वर्षात २४ T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून ७३८ धावा आल्या. या काळात बाबरची नाबाद ७५ धावांची सर्वोत्तम खेळी होती.