किडनीच्या कर्करोगापासून शरीराचा बचाव करतील 'हे' आरोग्यदायी पदार्थ
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि रास्पबेरी इत्यादी बेरीजचे सेवन केल्यामुळे किडनीचे आरोग्य निरोगी राहते. चवीला आंबटगोड असलेल्या बेरीज अनेक लोक आवडीने खातात. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स मूत्रपिंडातील जळजळ कमी करतात.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच मासे अतिशय आवडीने खातात. किडनीच्या निरोगी आरोग्यासाठी सॅल्मन, मॅकरेल आणि ट्यूना इत्यादी माशांचे सेवन करावे. हे मासे आरोग्यासाठी गुणकारी आहेत.
भारतीय स्वयंपाक घरातील अनेकांच्या आवडीची भाजी म्हणजे शिमला मिरची. शिमला मिरचीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. यामध्ये विटामिन सी आणि ए मोठ्या प्रमाणावर आढळून येते.
किडनीच्या आरोग्यासाठी अंड्यातील पांढरा बल्क अतिशय प्रभावी ठरतो. यामध्ये असलेले घटक किडनीचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.
हिवळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर लाल द्राक्ष उपलब्ध असतात. द्राक्षांचे सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेली जळजळ कमी होते. यामध्ये आढळणारे फ्लेव्होनॉइड्स शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते.