श्रावण महिन्यात अनेक सणसमारंभ असतात. या सणाच्या दिवशी सर्वच महिला, मुली सुंदर नटून थटून मेकअप करून तयार होतात. तसेच वेगवेगळ्या रंगाच्या आणि फॅब्रिकच्या साड्या सणाच्या दिवशी महिला नेसतात. श्रावण महिन्यात प्रामुख्याने हिरव्या रंगाची साडी नेसली जाते. साडी केवळ सणाच्या दिवशीच नाहीतर लग्न समारंभ, हळदी आणि मेहंदी कार्यक्रमांसाठी सुद्धा नेसली जाते. आज आम्ही तुम्हाला श्रावण महिन्यात नेसण्यासाठी साड्यांचे काही सुंदर प्रकार सांगणारे आहोत. या डिझाईन्सच्या आणि फॅब्रिकच्या साड्या प्रत्येक महिलेच्या कपाटात असायलाच हव्यात. (फोटो सौजन्य – pintrest)
श्रावणात महिन्यात नेसा 'या' प्रकारच्या सुंदर साड्या
महाराष्ट्राचे महावस्त्र म्हणून ओळख असलेली पैठणी साडी पुन्हा एकदा नव्याने फॅशन ट्रेंडमध्ये आली आहे. हल्ली प्रत्येक महिलेच्या कपाटात एकतरी पैठणी साडी नक्कीच पाहायला मिळेल.
बनारसी साडीची सगळीकडेच मोठी क्रेझ आहे. सणवार, लग्न समारंभ किंवा घरातील कार्यक्रमांच्या दिवशी उठावदार दिसण्यासाठी बनारसी साडीची निवड केली जाते . अनेक वेगवेगळ्या रंगांमध्ये बनारसी साड्या उपलब्ध आहेत.
वजनाने अतिशय हलकी आणि मोठ्या काठाची कांजीवरम सिल्क साडी सणाच्या दिवशी तुम्ही नेसू शकता. हेवी डिझाईन केलेला ब्लाऊज आणि सुंदर कांजीवरम साडी तुमचा लुक रॉयल आणि पारंपरिक करेल.
राजस्थान आणि गुजरातमधील बांधणी साड्या श्रावण महिन्यातील सणांसाठी तुम्ही नेसू शकता. हिरव्या, पिवळ्या आणि लाल रंगाच्या बांधणी साडीवर तुम्ही स्लीव्हलेस किंवा एथनिक ब्लाऊज सुंदर दिसेल.
श्रावण महिन्यात अतिशय हलकी आणि उठावदार दिसणारी साडी नेसायची असेल तर तुम्ही चंदेरी सिल्क साडीची निवड करू शकता. अतिशय नाजूक नक्षीकाम आणि चंदेरी जर वापरून बनवलेली साडी तुमचा लुक आणखीनच सुंदर करेल.