मुस्लिम देश NATO सारखे एकत्र येणार की केवळ पोकळ चर्चा? जाणून घ्या सविस्तर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
यासाठी पाकिस्तानने सर्वात पहिल्यांदा आवाज उठवला होता. पाकिस्तानचे मंत्री आसिफ ख्व्जा यांना ही लष्करी युती इस्लामिक देशाच्या स्वसंरक्षणासाठी असेल असे म्हटले होते. या परिषदेत पाकिस्तान, तुर्की, संयुक्त अरब अमिराती, बहरीन इजिप्त, जॉर्डन आणि मोरोक्को, कतारसह अनेक इस्लामिक देशाचे नेते उपस्थित होते. यावेळी सर्व नेत्यांनी इस्रायलच्या हल्ल्यांमा तीव्र विरोधक केला होता. तुर्की, इराण, इराकसह सर्वांनी इस्रायलसारख्या शत्रूंशी लढण्यासाठी नाटो सारखी इस्लामिक युती आवश्यक असल्याचे म्हटले.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना सर्व इस्लामिक देशांना अरब-इस्लामिक टास्क फोर्स तयार करण्यावर भर दिला. ही फोर्स केवळ इस्रायलला पूरती मार्यादित राहणार नाही तर इस्लामिक देशांवर हल्ल्या करणाऱ्या देशांविरोधात उभी राहिल असा याचा हेतू असल्याचे शाहबाज यांनी म्हटले होते. पण खरेच इस्लामिक देश युरोपीय देशांच्या नाटो संघटनेसारखे एकत्र येऊ शकतील का?
मुस्लिम देश NATO सारखी संस्था स्थापन करु शकतील का?






