दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी ठार (Photo Credit- X)
Disha Patani House Firing Case: अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना उत्तर प्रदेश एसटीएफने (UP STF) एन्काउंटरमध्ये कंठस्नान घातले आहे. गाझियाबादमध्ये ही चकमक झाली, ज्यात रवींद्र उर्फ कल्लू आणि अरुण या दोन आरोपींचा खात्मा करण्यात आला. हे दोघेही रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार गँगचे सक्रिय सदस्य होते, अशी माहिती मिळाली दिली. १२ सप्टेंबर रोजी बरेली येथे अभिनेत्री दिशा पाटनी यांच्या घरावर गोळीबार झाला होता. या घटनेची दखल स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेऊन तात्काळ तपास आणि कारवाईचे निर्देश दिले होते.
बरेली पोलिसांसह यूपी एसटीएफलाही या आरोपींचा शोध घेण्याचे काम देण्यात आले होते. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर राज्यांमधील गुन्हेगारी रेकॉर्डच्या आधारावर पोलिसांनी रवींद्र (रा. रोहतक, हरियाणा) आणि अरुण (रा. सोनीपत, हरियाणा) यांची ओळख पटवली.
Uttar Pradesh Additional Director General (ADG) of Law and Order, Amitabh Yash says to ANI, “On 12th September at around 3.45 am, firing was done at the residence of Actor Disha Patani in Bareilly. Rohit Godara and Goldy Brar claimed responsibility for the firing on social… pic.twitter.com/TAYqYk5rAk
— ANI (@ANI) September 17, 2025
आज यूपी एसटीएफच्या नोएडा युनिट आणि सीआय युनिट दिल्लीच्या संयुक्त पथकाची गाझियाबादमधील ट्रॉनिका सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या दोन आरोपींशी चकमक झाली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक ‘ग्लॉक’ आणि एक ‘झिगाना’ पिस्तूल तसेच मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त केली आहेत.
‘मी गांभीर्याने घेत नाहीये…’ दिशा पटानीच्या घरावर गोळीबार, वडील जगदीश पटानी यांचे समोर आले विधान
दिशा पाटनीच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या तपासामध्ये बरेली पोलिसांना एक मोठा सुगावा मिळाला होता. पोलिसांनी २५०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये आरोपींची बाईक अनेक ठिकाणी यू-टर्न घेताना दिसली होती. गोल्डी ब्रार गँगचे सदस्य पोलिसांना चुकवण्यासाठी अशाप्रकारे वारंवार मार्ग बदलतात, अशी माहिती पोलिसांना दिल्लीतून मिळाली होती.
तपासादरम्यान चार राज्यांतील (पंजाब, राजस्थान, हरियाणा, दिल्ली) ५१५ गुन्हेगारांचा डेटा पोलिसांना मिळाला होता. पोलीस सायबर आणि सर्व्हिलन्स टीमच्या मदतीने आरोपींचा शोध घेत होते, तसेच एटीएम फुटेज आणि ऑनलाइन ट्रान्सझॅक्शनचीही तपासणी करत होते.