पुण्यात पार पडला ड्रोन शो (फोटो- सोशल मीडिया)
अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारचा शो आयोजित करण्यात आला होता. पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अनोख्या दृश्याचा आनंद घेतला. ड्रोन शोच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळातील महत्वाच्या कामगिरी, विकसित भारत ही संकल्पना तसेच महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास यांचे दर्शन घडवण्यात आले.
विशेष म्हणजे, ड्रोनच्या माध्यमातून ऑपरेशन सिंधूर, गणपती बाप्पा, लोकमान्य टिळक, Make in India लोगो, मोदी आणि त्यांच्या आईचे फोटो, भारत मातेचा फोटो, ज्ञानेश्वर माऊली, महात्मा ज्योतिराव व सावित्रीबाई फुले, श्रीराम मंदिर आणि ग्यारा साल बेमिसाल अशा विविध प्रतिकृती आकाशात झळकल्या. प्रकाश आणि तंत्रज्ञानाच्या या अनोख्या मेळाव्याने प्रेक्षक थक्क झाले.
या कार्यक्रमाचे आयोजन खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. ड्रोन शोबरोबरच गायक अवधूत गुप्ते यांनी मराठी आणि देशभक्तिपर गाण्यांची सुरेख मैफल सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. त्यांच्या गाण्यांनी कार्यक्रमाला उत्साह आणि उर्जा दिली. पुण्यातील नागरिकांनी या भव्य शोला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रकाश, संगीत आणि देशभक्तीचा संगम झालेला हा अविस्मरणीय सोहळा पुणेकरांच्या मनात दीर्घकाळ कोरला जाईल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
देशभरात ७५,००० आरोग्य शिबिरे आयोजित
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस आहे. या निमित्ती देशभरात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. विशेषकरुन महिला आणि मुलांसाठी आज केंद्र सरकारने स्वस्थ नारी, सशक्त परिवार मोहीम सुरु केली आहे. याअंतर्गत याचा उद्देश महिला आणि मुलांसाठी आरोग्य सेवा मजबूत करणे, चांगली उपलब्धता, दर्जेदार काळजी सुनिश्चित करणे आहे.
शभरात ७५ हजार आरोग्य शिबिरे आयोजित केले जाणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री नड्डा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही शिबिरे आयुष्यामान आरोग्य मंदिरे, सामुदायिक आरोग्य केंद्रे आणि सरकारी आरोग्य संस्थांमध्ये आयोजित केली जाती. या शिबिरांमध्ये विशेष करुन महिला आणि मुलांच्या आरोग्यवर लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे. याअंतर्गत आरोग्य तपासणी, आवश्यक उपचारही दिले जाणार आहेत. देशातील प्रत्येक कुटुंबाला दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.