सणावाराच्या दिवसांमध्ये सर्वच महिला नवीन साडी विकत घेतात. साडीवरील लुक आणखीनच सुंदर आणि उठावदार दिसण्यासाठी वेगवेगळ्या डिझाईनचे ब्लाऊज शिवले जातात. मात्र कायमच आरी वर्क किंवा स्टोन वर्क करून घेतलेले ब्लाऊज घालण्याचा कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन डिझाईन प्रत्येकालाच हवी असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ब्लाऊजच्या मागील गळ्याला बो डिजाईन्सच्या ब्लाऊजचे काही सुंदर पॅर्टन सांगणार आहोत. या डिझाईनचे ब्लाऊज कोणत्याही साडीवर अतिशय सुंदर दिसतील. (फोटो सौजन्य: Pinterest)
स्टायलिश लुक हवा असेल तर ब्लाऊजच्या मागील गळ्याला शिवा 'या' पॅर्टनचे बो डिजाईन्स
सगळ्यांचं बंद गळ्याचे ब्लाऊज घालायला खूप जास्त आवडतात. त्यामुळे तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज शिवून घेऊ शकता.
नेटच्या साडीवरील ब्लाऊजवर तुम्ही सिंपल बो लावण्यापेक्षा फुलांच्या पॅर्टनमधील बो बनवून लावू शकता. हा पाहून सगळेच तुमचं कौतुक करतील.
जुन्या स्टाईलच्या ब्लाऊजला नवीन टच देण्यासाठी या पद्धतीने शिवलेले ब्लाऊज अतिशय सुंदर दिसेल.
काहींना मोठ्या आकाराचे बो खूप जास्त आवडतात. कोणतीही शिफॉन किंवा पार्टी वेअर साडीवर तुम्ही या डिझाईनचे ब्लाऊज शिवून घेऊ शकता.
व्हि नेक किंवा स्वेअर नेक ब्लाऊज शिवल्यानंतर त्यावर तुम्ही या डिझाईनचे बो तयार करून घेऊ शकता. यामुळे तुमचा ब्लाऊज भरगच्च वाटेल.