अंगणवाडीतील ६९ टक्के बालकांची तपासणी (फोटो- ai gemini)
या कार्यक्रमाची सुरुवात फेब्रुवारी २०१३ मध्ये करण्यात आली. जन्मापासून १८ वर्षांपर्यंतच्या बालकांमध्ये जन्मजात व्यंग, बालपणातील आजार, कमतरता आणि विकासात्मक विलंब या चार बाबींचे लवकर निदान करण्यावर कार्यक्रमाचा भर आहे. नवजात बालकांची जन्माच्या ठिकाणी, सहा आठवडे ते सहा वर्षे वयोगटातील बालकांची अंगणवाडीत आणि सहा ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची शासकीय व अनुदानित शाळांमध्ये तपासणी केली जाते.
Nagpur Health : रुग्णांच्या जीवाशी खेळाल तर कारवाई अटळ; आरोग्य विभागाचा इशारा
अंगणवाडीतील ६० लाख ९ हजार ७५६ बालकांच्या तपासणीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ४१ लाख २८ हजार ६७४ बालकांची तपासणी झाली असून, उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण ६९ टक्के आहे. तसेच १ लाख १० हजार ३६४ अंगणवाडी केंद्रांपैकी ८९ हजार ४२ केंद्रांची तपासणी झाली असून, केंद्र तपासणीचे प्रमाण ८० टक्के आहे.
शाळांमधील तपासणी तुलनेने कमी झाली आहे. १ कोटी २४ लाख ४३ हजार ८८९ विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट असताना ५३ लाख ५५ हजार ४३१ विद्यार्थ्यांची तपासणी झाली आहे. त्यामुळे तपासणीचे प्रमाण ४३ टक्के आहे. राज्यातील ८८ हजार २७८ शाळांच्या तपासणीचे उद्दिष्ट असताना ५९ हजार ४९४ शाळांमध्ये तपासणी झाली असून, हे प्रमाण ६७ टक्के आहे.
तपासणीत गंभीर स्थिती आढळलेल्या बालकांना पुढील उपचारासाठी संदर्भित केले जाते. एप्रिल ते ऑगस्ट २०२६दरम्यान ८२० हृदयशस्त्रक्रिया निश्चित करण्यात आल्या असून ८१० पूर्ण झाल्या आहेत. इतर शस्त्रक्रियांसाठी निश्चित केलेल्या ७२५९ पैकी ७२५२ शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.
दिवसातून ३ ते 4 लिटर पाणी पिल्याचे काय आहेत फायदे? जाणून घ्या चांगल्या आरोग्याचा रामबाण उपाय
राज्यात या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी ११९६ मोबाइल आरोग्य पथके कार्यरत आहेत. प्रत्येक पथकात दोन वैद्यकीय अधिकारी, एक एएनएम आणि एक औषधनिर्माता असतो. तसेच १ एप्रिल २०२६पासून आरबीएसके २.० पोर्टल सुरू करण्यात आले असून, मोबाइल आरोग्य पथक, जिल्हा आरबीएसके आणि राज्य आरबीएसके अशा तीन स्तरांवर त्याचा वापर केला जात आहे.
अंगणवाडी बालकांचे उद्दिष्ट : ६०,०९,७५६
अंगणवाडी तपासणी : ४१,२८,६७४ (६९%)
शालेय विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट : १,२४,४३,८८९
शालेय तपासणी : ५३,५५,४३१ (४३%)
आरोग्यविषयक समस्या आढळलेली बालके : ६,५८,३८४
हृदयशस्त्रक्रिया पूर्ण : ८१०
इतर शस्त्रक्रिया पूर्ण : ७,२५२
मोबाइल आरोग्य पथके : १,१९६






