दिवसभर काम करून थकल्यानंतर रात्रीच्या वेळी खूप गाढ झोप लागते. सकाळी लवकर उठण्याची अजिबात इच्छा होत नाही. आपल्यातील अनेकांना रात्री ३ ते ४ वाजेपर्यंत जागे राहण्याची सवय असते. रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी उठण्याची अजिबात इच्छा होत नाही. ११ किंवा १२ नंतर झोप पूर्णपणे झाल्यानंतर उठून अंथरून काढले जाते. नेहमीच रात्री उशिरापर्यंत जागे राहणे शरीरासाठी अतिशय घातक ठरते. त्यामुळे कायमच रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठावे. चला तर जाणून घेऊया वयानुसार सकाळी उठण्याची योग्य वेळ कोणती. (फोटो सौजन्य – istock)
वयानुसार सकाळी उठण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचे शरीराला होणारे फायदे

दीर्घकाळ निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी शांत झोप घेणे फार आवश्यक आहे.झोपल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात, पण अतिप्रमाणात झोपल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची सुद्धा शक्यता असते.

आयुर्वेदानुसार, सूर्योदयाच्या १ तास ३६ मिनिटे आधीच्या वेळेला ब्रह्म मुहूर्त मानले जाते. ही वेळ म्हणजे साधारण पहाटेचे ४:०० ते ५:३०. या वेळेत उठल्यास शरीरातील वात दोषाचे संतुलन राहते.

सकाळी ६:०० ते ८:३० च्या दरम्यान शरीरात 'कॉर्टिसोल' हार्मोन्सची पातळी वाढते. ज्यामुळे झोपेतून उठल्यानंतर शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.

९-१० वाजेपर्यंत झोपून राहिल्यास शरीरातील मेलाटोनिनचे संतुलन बिघडते आणि दिवसभर सुस्ती जाणवू लागते. त्यामुळे वयानुसार योग्य वेळी उठणे फार आवश्यक आहे.

१३ वयोगातील मुलांना १२ ते १३ तासांची झोप फार आवश्यक असते, तर १८ ते २५ वर्षे वयोगटातील तरुणांना ७ ते ९ तास झोप पुरेशी आहे. त्यामुळे सकाळी ५:३० ते ६:३० च्या दरम्यान उठल्यास शरीर निरोगी राहील.






