कडक उन्हात बाहेर गेल्यानंतर प्रत्येकाला थंड पाणी किंवा काहींना काही थंड पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. या दिवसांमध्ये शरीरातील तापमान थंड ठेवण्यासाठी आणि शरीरात दीर्घकाळ ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन केले जाते. लिंबामध्ये विटामिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि डिटॉक्सिफाईंग गुणधर्म आढळून येतात. लिंबू पाणी प्यायल्यामुळे केवळ तहान भागवली जात नाहीतर शरीर ताजेतवाने ठेवण्यासाठी मदत करते. उपाशी पोटी लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. चला तर जाणून घेऊया उन्हाळ्यात लिंबू पाणी पिण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
उन्हाळ्यात लिंबू पाणी कधी प्यावे? जाणून घ्या लिंबू पाणी प्यायल्यामुळे शरीराला होणारे गुणकारी फायदे

लिंबू पाणी मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करते. यामध्ये असलेले पेक्टिन फायबर भूक नियंत्रणात करण्यास करते. वजन वाढल्यानंतर कोणतेही सप्लिमेंट्स पिण्याऐवजी लिंबू पाणी प्यावे.

लिंबू पाणी केवळ शरीरसाठीच नाहीतर त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. यामुळे चेहऱ्यावरील ग्लो वाढतो आणि त्वचेवर आलेले काळे डाग कमी होण्यास मदत होते.

शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून काळे मीठ टाकावे. हे पेय उपाशी पोटी प्यायल्यास शरीरातील घाण बाहेर पडून जाते.

वाढत्या उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी आणि क्षार कमी झाल्यानंतर लिंबू पाणी प्यावे. यामुळे इलेक्ट्रोलाइट्सची पातळी संतुलित राहण्यास मदत होते.

लिंबू पाणी जेवणाआधी किंवा सकाळी उपाशी पोटी प्यावे. यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात.






