(फोटो सौजन्य-AI एआय)
आपल्या शरीराला दैनंदिन कामे करण्यासाठी, श्वासोच्छवास आणि पचनक्रियेसारख्या मूलभूत जैविक प्रक्रियांसाठी ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा आपल्याला अन्नातून मिळते, ज्याला आपण कॅलरी म्हणतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, कॅलरी हे आपल्या शरीराचे इंधन आहे. पण वजन कमी करणे किंवा वाढवणे हे या कॅलरीच्या गणितावरच अवलंबून असते.
काय आहे ‘कॅलरी इनटेक‘चे गणित?
तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी ‘कॅलरी इन’ आणि ‘कॅलरी आऊट’ या दोन गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.
१. वजन मेंटेन ठेवण्यासाठी
जितक्या कॅलरीज तुम्ही अन्नातून घेता, तितक्याच कॅलरीज जर शारीरिक हालचालींद्वारे वापरल्या गेल्या, तर तुमचे वजन स्थिर राहते. याला ‘मेंटेनन्स कॅलरीज’ म्हणतात. एका सामान्य पुरुषाला दिवसभरात सुमारे २००० ते २५०० कॅलरीज, तर स्त्रीला १८०० ते २००० कॅलरीजची गरज असते. हे प्रमाण वयानुसार, उंची-वजनानुसार, दिनचर्येतील कामाच्या तीव्रतेनुसार बदलते.
२. वजन कमी करण्यासाठी – Calorie Deficit
वजन कमी करायचे असेल तर शरीराला लागणाऱ्या मेंटेनन्स कॅलरीजपेक्षा ३०० ते ५०० कॅलरीज कमी खाणे आवश्यक असते. जेव्हा तुम्ही कमी कॅलरीज घेता, तेव्हा शरीर उरलेली ऊर्जा मिळवण्यासाठी साठवलेली चरबी जाळू लागते. त्यामुळे हळूहळू वजन कमी होते.
३. वजन वाढवण्यासाठी – Calorie Surplus
वजन वाढवायचे असल्यास मेंटेनन्स कॅलरीजपेक्षा ३०० ते ५०० कॅलरीज जास्त घेणे गरजेचे असते. या एक्स्ट्रा कॅलरीज योग्य व्यायामासोबत घेतल्यास शरीरात मसल आणि सुदृढ वजन वाढण्यास मदत होते.
लक्षात ठेवा
फक्त कॅलरीज मोजणे पुरेसे नाही, तर अन्नाची गुणवत्ताही महत्त्वाची आहे. जंक फूडऐवजी प्रोटिन, फायबर, हिरव्या भाज्या, फळे आणि तांदूळ/गहू यांसारख्या पौष्टिक पदार्थांमधून कॅलरीज मिळवणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.योग्य आहार आणि नियमित व्यायाम या जोडगोळीनेच तुम्ही तुमचे वजन आणि आरोग्य चांगले ठेवू शकता.






