'या' घरगुती पदार्थांच्या वापरामुळे आठवडाभरात चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो
खोबऱ्याच्या तेलात असलेले गुणकारी घटक त्वचा हायड्रेट ठेवतात. यासोबतच चेहऱ्यावरील ग्लो वाढवतात. थंडीच्या दिवसांमध्ये रात्री झोपण्याआधी त्वचेवर खोबरेल तेल लावावे. यामुळे त्वचा चमकदार दिसते.
बदाम तेलाचा वापर त्वचेसाठी केल्यास चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग कमी होतील आणि त्वचा अधिक सुंदर दिसेल. या तेलात भरपूर प्रमाणात विटामिन ई असते. चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यासाठी बदाम तेलाचा वापर करावा.
कच्चे दूध त्वचेवरील काळे डाग आणि चेहऱ्यावरील काळपटपणा कमी करते. यासाठी कच्चे दूध कापसाच्या सहाय्याने संपूर्ण चेहऱ्यावर लावून अर्धा तास ठेवावे. त्यानंतर पाण्याने त्वचा धुवून टाकावी.
वातावरणात होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे त्वचा खूप जास्त कोरडी होते. त्वचेवर वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी रात्री झोपण्याआधी कोरफड जेल चेहऱ्यावर लावावे.
तिळाच्या तेलाचा वापर जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तसाच वापर त्वचा सुंदर आणि हायड्रेट ठेवण्यासाठी सुद्धा केला जातो. त्वचेला खोलवर पोषण देण्यासाठी तिळाचे तेल वापरावे.