भारतीय शिक्षण आणि नोकरीसाठी संपूर्ण जगभरात फिरत असतात. जगभरात असे अनेक देश आहेत, ज्या देशांमध्ये भारतीय राहतात. पण आता आम्ही तुम्हाला अशा काही देशांबद्दल सांगणार आहोत, जिथे भारतीय व्यक्ति राहत नाही. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की या देशांमध्ये एकही भारतीय व्यक्ति राहत नाही. चला तर मग अशा काही देशांबद्दल जाणून घेऊया, ज्या देशांमध्ये भारतीय व्यक्ति राहत नाहीत. (फोटो सौजन्य – Pinterest)
जगातील 5 असे देश, जिथे नाही राहत एकही भारतीय! नाव वाचून तुम्हीही व्हाल हैराण
ग्रीनलँड हा एक अतिशय थंड आणि बर्फाळ देश आहे. थंड हवामानामुळे, येथे लोकसंख्या खूपच कमी आहे. याच कारणामुळे येथे भारतीय राहत नाही.
पॅसिफिक महासागराच्या दुर्गम भागात वसलेल्या तुवालू देशात भारतीय स्थायिक नाहीत. हा देश समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे.
आग्नेय युरोपमध्ये स्थित बल्गेरियामध्ये देखील भारतीय वास्तव्य करत नाहीत. हा देश वाळूचे किनारे आणि काळा समुद्र यासाठी प्रसिद्ध आहे.
इटलीच्या अपेनाइन पर्वतरांगांमध्ये स्थित, सॅन मारिनो हे जगातील सर्वात जुन्या प्रजासत्ताकांपैकी एक आहे. भारतासह जगभरातून पर्यटक या देशाला भेट देण्यासाठी येतात, परंतु येथे भारतीय राहत नाही.
रोममध्ये असलेले वेटिकन सिटी जगातील सर्वात छोटा स्वतंत्र देश आहे. हा देश कॅथोलिक चर्चचे आध्यात्मिक केंद्र आहे. या देशात दरवर्षी भारतीय फिरायला येतात, पण इथे राहत कोणीच नाही.