
पंढरपूर नगरपरिषदेसाठी दुसऱ्या दिवशी 17 अर्ज माघारी
पंढरपूर : नगरपरिषदांसह इतर स्थानिक निवडणुका घेतल्या जात आहेत. अनेकजण दाखल केलेले अर्ज माघारी घेताना दिसत आहे. असे असताना आता पंढरपूर नगरपरिषदेसाठी अर्ज माघारी घेण्याच्या दुसऱ्या दिवशी 17 नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. याबाबतची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
पंढरपूर नगरपरिषदेच्या 36 नगरसेवक पदासाठी व एक नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. नगराध्यक्षपदासाठी 8 उमेदवारी अर्ज दाखल आहेत. तर नगरसेवक पदासाठी 366 अर्ज दाखल झाले होते. यात नगराध्यक्षपदासाठी 7 तर नगरसेवक पदासाठी 323 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. उमेदवारी वैध ठरलेल्या उमेदवारांना अर्ज माघार घेण्यासाठी शुक्रवारी (दि.21) वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे अर्ज माघार घेण्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच बुधवारी (दि.19) एकही अर्ज माघारी घेण्यात आला नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.20) 17 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. शुक्रवार (दि.21) अर्ज माघार देण्याचा शेवटचा दिवस आहे.
हेदेखील वाचा : Chhatrapati Sambhajinagar News: सिल्लोडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी १३१२ उमेदवार मैदानात; घोडेबाजाराच्या चर्चांना उधाण
दरम्यान, प्रभाग क्र.2 ब मधून श्रीनिवास धनंजय बोरगावकर अपक्ष, अश्विनी श्रीनिवास बोरगावकर अपक्ष, प्रभाग क्र.9 ब मधून राजु शमशुद्दीन सत्तारमेकर अपक्ष, जावेद काशिम शेख अपक्ष, सुनिल मोहन अधटराव अपक्ष, प्रभाग क्र.13 अ मधून रुक्मिणी धनाजी धोत्रे अपक्ष, प्रभाग क्र.13 ब मधून राजन बळीराम थोरात अपक्ष, प्रभाग क्र.14 अ मधून शैलजा बाळासाहेब कसबे अपक्ष अर्ज मागे घेतले आहेत.
कोणी घेतले अर्ज मागे?
प्रतिक्षा ऋषिकेश भालेराव अपक्ष दोन अर्ज, प्रभाग क्र. 14 ब मधून विजय परमेश्वर वरपे अपक्ष, तुळजाराम माणिक धोत्रे अपक्ष, प्रभाग क्र. 17 अ मधून प्रसाद श्रीमंत यादव अपक्ष, उमेश भगवान सर्वगोड अपक्ष, अंबालाल किसन दोडिया अपक्ष, प्रभाग क्र.17 ब मधून उमा संजय घोडके विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी, उमा संजय घोडके अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत.