Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded News : ‘महाज्योती’चे प्रशिक्षणच झाले ठप्प; इंटरनेटची अस्थिरता, वारंवार खंडित होणारी वीजपुरवठा व्यवस्था

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) कडून दिले जाणारे परीक्षांचे प्रशिक्षण गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प असल्याने मराठवाड्‌यात मोठे नुकसान झाले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 25, 2026 | 01:55 PM
Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute stop working in Marathwada News

Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute stop working in Marathwada News

Follow Us
Follow Us:

Nanded News : नांदेड : स्पर्धा परीक्षांची तयारी म्हणजे अनेक युवकांच्या व विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा टप्पा. परंतु महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) कडून दिले जाणारे बैंक, रेल्वे, एलआयसी आदी परीक्षांचे प्रशिक्षण गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प असल्याने मराठवाड्‌यातील ओबीसी विद्यार्थ्यांची स्वप्ने अक्षरशः ‘स्क्रीन’वर अडकून पडली आहेत. यापूर्वी खासगी शिकवणी संस्थांच्या माध्यमातून ऑफलाइन प्रशिक्षण दिले जात होते.(Nanded News)

अभ्यासिका, मार्गदर्शक प्राध्यापक, शंका निरसन सत्रे यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धेची दिशा मिळता होती. मात्र यावर्षीपासून प्रशिक्षण पूर्णपणे ऑनलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘डिजिटल’ सोयींचा दाखला देत हा बदल करण्यात आला असला, तरी ग्रामीण भागातील वास्तव वेगळे आहे. इंटरनेटची अस्थिरता, वारंवार खंडित होणारी वीजपुरवठा व्यवस्था आणि मोबाईल डेटाचा खर्च यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षणात सातत्य ठेवणे कठीण जात आहे. ओबीसी संघटनांनी प्रशासनाच्या अनास्थेवर तीव्र आक्षेप घेतला आहे.

हे देखील वाचा : ब्रिटनच्या निवडणुकीत PM मोदींच्या फोटोवरून राडा; ‘ग्रीन पार्टी’वर गंभीर आरोप; हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा प्रयत्न?

मुख्यमंत्र्यांना दिले पत्र

सकल ओबीसी महामौर्चाने  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहून तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे. ‘ही योजना ओबीसी विद्याथ्यर्थ्यांसाठी संधीचा पूल आहे: तोच प प्रशासनाच्या दिरंगाईमुळे कोसळत आहे, असा आर संघटनांकडून करण्यात आला आहे. प्रशिक्षण ऑफलाइन स्वरूपात आणि पूर्ण विद्यावेतनास तातडीने सुरू न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे, ‘महाज्योती’ प्रशासनाने एसएससी व इतर परीक्ष प्रशिक्षण सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. बैंक व रेल्वे भरतीच्या पूर्वपरीक्षा मार्चमध्ये होत असून एप्रिलपासू प्रशिक्षण सुरू होईल, असे सांगण्यात आले. आधुनिक सौयी आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ऑनलाइ पद्धतीचा अवलंब केल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
तथापि, एका विद्यार्थ्यांवर ऑनलाइन प्रशिक्षणासाठी सुमारे ७हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित असल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

हे देखील वाचा : प्रदूषणाशी लढा! मेट्रो प्रवासातून दर किलोमीटरला वाचतोय १०८.५ मिलीग्रॅम $CO_2$

इतका खर्च का ?

‘युट्यूब’ व इतर अॅपवर मोफत सामग्री उपलब्ध असताना इतका खर्च का? असा सवालही उपस्थित होत आहे. मराठवाड्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ही योजना केवळ प्रशिक्षण नसून सामाजिक उन्नतीची संधी आहे. प्रशासनाने डिजिटल निर्णय घेताना भौगोलिक आणि सामाजिक वास्तवाचा विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा, स्क्रीनवरील वर्ग सुरू राहतील; पण अनेकांच्या होणार नाही. आयुष्याचा ‘लॉग-इन’ मात्र होणार नाही.

झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करा

सोमवारी परभणी जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, रब्बीतील गहू, ज्वारी, हरभरा, भाजीपाला, फळपिके इत्यादींचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तात्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी आमदार राजेश विटेकर व आमदार रत्नाकरराव गुट्टे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून मांडली होती. जिल्ह्यातील सोनपेठ, पाथरी, मानवत, परभणी पूर्णा, पालम, गंगाखेड, तालुक्यातील अनेक भागात पिकांचे नुकसान झाले असल्याचे आमदार विटेकर या व आमदार गुट्टे यांनी त्या लक्षवेधी सूचनामध्ये म्हटले होते. परभणी जिल्ह्याप्रमाणेच महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतीपिकांचे नुकसान झाले आहे त्या सर्व जिल्ह्यातील प्रशासनास तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून दिले जातील, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिली.

Web Title: Mahatma jyotiba phule research and training institute stop working in marathwada news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • daily news
  • nanded news
  • political news

संबंधित बातम्या

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत
1

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात
2

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला
3

Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश
4

Congress Politics : राहुल गांधींची नवी कोअर टीम तयार; प्रणिती शिंदेंसह के. सी. वेणुगोपाल यांचाही समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.