Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati Division : शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी 20 नामांकन अर्ज दाखल; पोहरे, शिंदेंचे शक्तिप्रदर्शन

रेवणे या विद्यमान नगरसेविका असून महापालिकेच्या शिक्षण सभापती म्हणूनही कार्यरत आहेत. आमदार राणा यांच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणांना वेगळे वळण मिळण्याची चर्चा आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 07, 2026 | 07:36 AM
शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी 20 नामांकन अर्ज दाखल; पोहरे, शिंदेंचे शक्तिप्रदर्शन

शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी 20 नामांकन अर्ज दाखल; पोहरे, शिंदेंचे शक्तिप्रदर्शन

Follow Us
Follow Us:
  • शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 20 उमेदवारी अर्ज
  • उमेदवारांची एकूण संख्या 31
  • निवडणुकीत वाढली चुरस
अमरावती : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या सहाव्या आणि शेवटच्या दिवशी मंगळवारी २० उमेदवारांनी २९ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. मात्र, मंगळवारी २ व्यक्तींनी ६ नामनिर्देशनपत्रे उचल केली आहेत. आतापर्यंत नामनिर्देशनपत्रे दाखल केलेल्या उमेदवारांची एकूण संख्या ३१ झाली आहे.

क नामनिर्देशन पत्रे दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये सुमित सुरेशराव पवार (अपक्ष), उपेंद्र बाबाराव पाटील (शिवसेना अपक्ष), संगीता सचिंद्र शिंदे-बोंडे (भाजपा २अपक्ष), विनोद प्रल्हाद कडू (अपक्ष), दिलीप भिमराव कडू (अपक्ष), सजील खान खलील खान (अपक्ष), श्रीकृष्ण सुर्यभान पहुरकर (अपक्ष), अदिती ऋषिकेश पोहरे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस- ३), भोयर चंद्रशेखर उर्फ शेखर मनोहरराव (भाजपा+अपक्ष), प्रा. डॉ. संतोष श्रीकृष्ण हुशे (अपक्ष), नितीन सुभाषराव आगे (अपक्ष ३), प्रीती हर्षल रेवणे (राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी अपक्ष), गजानन रामचंद्र उल्हे (अपक्ष), मिलिंद तुकाराम ब्राह्मणे (अपक्ष), किरण अर्जुन चौधरी (अपक्ष), हेमलता दिलीपसिंग मुनौत (अपक्ष), किरण अर्जुन पवार (अपक्ष), राजेशकुमार शालिग्राम कड (अपक्ष), प्रा. अनिल मधुकरराव काळे (बळीराजा पार्टी), रामदास संपतराव कटक (अपक्ष) यांचा समावेश आहे.

Rahul Gandhi Detained : दिल्लीमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; 8 तासांच्या ठिय्यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

उमेदवाराने लेखी प्राधिकार दिलेल्या त्याच्या कोणत्याही प्रस्तावकाला किंवा निवडणूक प्रतिनिधीला निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहआयुक्त (सामान्य प्रशासन) विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडे त्यांच्या कार्यालयात शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत देता येईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

उमेदवारांची एकूण संख्या 31

काँग्रेसच्या उमेदवार अदिती ऋषिकेश पोहरे यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार बलवंत वानखडे, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, अॅड. यशोमती ठाकूर, हर्षवर्धन देशमुख, आमदार साजिद पठाण, पदवीधर आ. धीरज लिंगाडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, दिलीप एडतकर, महिला अध्यक्ष जयश्री वानखडे, प्रदेश उपाध्यक्ष नजीर खान बीके, अंजली ठाकरे, गणेश रॉय, मनपा विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. शेवटच्या दिवसापर्यंत ३१ उमेदवारांनी नामांकन दाखल केले.

युवा स्वाभिमानचीही रिंगणात उडी

आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या अॅड. प्रीती हर्षल रेवणे यांनीही पक्षाचे वरिष्ठ मार्गदर्शक सुनील राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. समर्थकांच्या घोषणाबाजीदरम्यान त्यांनी विभागीय आयुक्तांकडे अर्ज सादर केला. रेवणे या विद्यमान नगरसेविका असून महापालिकेच्या शिक्षण सभापती म्हणूनही कार्यरत आहेत. आमदार राणा यांच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणांना वेगळे वळण मिळण्याची चर्चा आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे, महिला जिल्हाध्यक्षा सोनाली नवले, उपमहापौर सचिन भेंडे, नगराध्यक्षा योगिता कोलटके, नितीन काळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: 20 nomination papers filed for the amravati division teachers constituency election nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 07:36 AM

Topics:  

  • Amravati Politics
  • political news

संबंधित बातम्या

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
1

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

‘राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार’; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा निर्णय
2

‘राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार’; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा निर्णय

काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा समोर; थेट माजी मुख्यमंत्र्यांना पक्षाकडून आला ‘तो’ आदेश
3

काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा समोर; थेट माजी मुख्यमंत्र्यांना पक्षाकडून आला ‘तो’ आदेश

‘विरोधक संपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा कुटिल डाव जनताच उधळून लावेल’; अभयसिंह जगताप यांचं विधान
4

‘विरोधक संपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा कुटिल डाव जनताच उधळून लावेल’; अभयसिंह जगताप यांचं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.