Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aaditya Thackeray Birthday : सामाजिक कार्यक्रमांसह साजरा केला जाणार आदित्य ठाकरेंचा वाढदिवस; ‘मातोश्री’वर शिवसैनिकांची गर्दी

लाखो शिवसैनिक आणि युवासैनिकांसाठी आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस हा एका उत्सवापेक्षा कमी नाही. आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी 'मातोश्री'वर सकाळपासूनच शिवसैनिकांच्या लांबच लांब रांगा लागतात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 13, 2026 | 01:13 PM
आमच्या खासदारांवर आमचा अंधविश्वास; ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

आमच्या खासदारांवर आमचा अंधविश्वास; ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Follow Us
Follow Us:

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते, युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस शनिवारी (दि.१३) मुंबईसह राज्यभरात साजरा केला जाणार आहे. आदित्य ठाकरेंचा वाढदिवस सामाजिक आणि पर्यावरणविषयक कार्यक्रमांसह साजरा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वाढदिवसानिमित्त स्वत: आदित्य ठाकरे दुपारी १२:३० ते ४ या वेळेत त्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारतील.

आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस दरवर्षी साजरा केला जातो. लाखो शिवसैनिक आणि युवासैनिकांसाठी आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस हा एका उत्सवापेक्षा कमी नाही. आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘मातोश्री’वर सकाळपासूनच शिवसैनिकांच्या लांबच लांब रांगा लागतात. ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा आदराने स्वीकारतात आणि त्यांचे आभार मानतात. ही परंपरा कायम ठेवत, यावर्षीही आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक ‘मातोश्री’ येथे येणार असल्याची माहिती दिली जात आहे. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरात विविध सामाजिक आणि पर्यावरणविषयक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

Sanjay Raut News : मोदींसारखा क्रूर आणि अघोरी नेता देशात होऊच शकत नाही; संजय राऊतांचा भाजपवर घणाघाती हल्ला

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मातोश्री’ परिसर भगव्या दिव्यांनी उजळून निघणार आहे. शिवसैनिक भगव्या रंगाच्या टोप्या, वस्त्रे, फेटे घालून आणि भगवे झेंडे घेऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. मातोश्री संकुलात फडकत असलेले भगवे झेंडे, ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘आदित्यसाहेब, पुढे चला, आम्ही तुमच्यासोबत आहोत’ यांसारख्या घोषणा दिल्या जातात. या संपूर्ण परिसरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते. अनेक शिवसैनिक आणि शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आदित्य ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येताना दिसत आहे.

पर्यावरणमंत्री म्हणून सांभाळला पदभार

आदित्य उद्धव ठाकरे हे एक भारतीय राजकारणी आहेत, ज्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये उच्च शिक्षण, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री म्हणून काम केले आहे. ते मुंबईतील वरळी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य देखील आहेत. आदित्य ठाकरे हे शिवसेनेची युवा शाखा असलेल्या युवासेनेचे अध्यक्ष आहेत. ते महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्री राहिले आहेत आणि ३० डिसेंबर २०१९ रोजी कॅबिनेट मंत्री म्हणून राज्य मंत्रिमंडळात सामील होते.

Maharashtra Politics : ‘काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज’; विरोधी पक्षांच्या विलीनीकरणावर मुख्यमत्र्यांचा घणाघात; म्हणाले, भाजपलाच…

Web Title: Aaditya thackerays birthday to be celebrated with social programs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • political news
  • Shivsena Politics

संबंधित बातम्या

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार
1

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार

Aditya Thackeray: “शेतकरी संकटात, तातडीने मदत द्या!”; खानापूरमध्ये आदित्य ठाकरेंची पाहणी अन् धीर!
2

Aditya Thackeray: “शेतकरी संकटात, तातडीने मदत द्या!”; खानापूरमध्ये आदित्य ठाकरेंची पाहणी अन् धीर!

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
3

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
4

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.