Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhijeet Dipke on Amit Shah: ‘अमित शाह यांच्या आदेशावरूनच…’, अभिजीत दीपके यांचा खळबळजनक आरोप, तर केंद्र सरकारवरही टीकेचे बाण

Abhijeet Dipke: CJP प्रमुख अभिजित दीपके यांनी 'संसद चलो' मार्चदरम्यान विद्यार्थ्यांवर पेलेट गन चालवल्याचा आरोप करत गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 31, 2026 | 04:49 PM
Abhijeet Dipke on Amit Shah: 'अमित शाह यांच्या आदेशावरूनच...', अभिजीत दीपके यांचा खळबळजनक आरोप (Photo Credit- X)

Abhijeet Dipke on Amit Shah: 'अमित शाह यांच्या आदेशावरूनच...', अभिजीत दीपके यांचा खळबळजनक आरोप (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • ‘अमित शाह यांच्या आदेशावरूनच…’
  • अभिजीत दीपके यांचा खळबळजनक आरोप
  • तर क्रेंद सरकारवरही टीकेचे बाण
Abhijeet Dipke on Amit Shah News: कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजित दीपके (Abhijeet Dipke) यांनी दावा केला की, २० जुलै रोजी झालेल्या ‘संसद’ मोर्चादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनीच विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करण्याचे आदेश दिले असावेत आणि या पोलीस कारवाईवरून त्यांनी शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना अभिजित दीपके म्हणाले की, देशातील लोकशाही “धोक्यात” आहे, न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे, तर राजकीय पक्ष फोडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीत महिनाभर आंदोलन केले होते. धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि केंद्र सरकारने आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर हे आंदोलन संपले.

केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचे आरोप

अभिजित दीपके म्हणाले की, न्यायव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारखे पक्ष मोडण्यासाठी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) यांचा कसा वापर केला गेला, हे आपण सर्वांनी पाहिले आहे. लोकशाहीचे रक्षण करणे ही देशाच्या सर्वोच्च संस्थांची जबाबदारी होती, एका व्यक्तीची हुकूमशाही प्रस्थापित होऊ न देणे. त्यांनी हे घडू दिले. हे रोखण्यासाठी केवळ विरोधी पक्षांनीच नव्हे, तर सामान्य जनतेनेही एकत्र आले पाहिजे.

नवे शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर टीका

सीजेपी प्रमुख दीपक यांनी प्रल्हाद जोशी यांच्या नव्या शिक्षणमंत्रीपदी नियुक्तीवर टीका करत त्यांना एक विचित्र व्यक्ती म्हटले आहे. त्यांनी आरोप केला की, जर देशाचे शिक्षणमंत्री बलात्काऱ्यांना पाठिंबा देत असतील, तर याचा अर्थ धर्मेंद्र प्रधान यांना हटवल्यानंतर आणखी एका विचित्र व्यक्तीला आणले गेले आहे. देशाला कोणता संदेश दिला जात आहे? ते दुसरे काहीही करू शकत नाहीत कारण त्यांचा पक्ष ‘गुंडांनी’ भरलेला आहे. त्यांच्या कार्यकाळात बलात्काराचा दोषी राम रहीमसारख्या लोकांना पॅरोलवर सोडण्यात आले आहे. हे सरकार गुंड आणि बलात्काऱ्यांना पाठिंबा देते.

‘थोडीशीही लाज उरली असेल तर अमित शाहांचा राजीनामा घ्या’; मल्लिकार्जुन खरगेंचा मोदींवर हल्लाबोल

भाजपमध्ये सामील व्हा, नाहीतर…

गुरुवारी, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपक यांनी भाजप आणि त्यांच्या सर्वोच्च नेतृत्वावर गंभीर आरोप केले. दीपक यांनी सांगितले की, आंदोलनादरम्यान त्यांच्यावर दबाव होता. त्यांना भाजपमध्ये सामील होऊन आपले कुटुंब आणि मित्रांना वाचवण्यास सांगितले जात होते. असे न केल्यास त्यांना, त्यांच्या आई-वडिलांना आणि व्यावसायिक मित्रांना जीवे मारण्याच्या सतत धमक्या दिल्या जात होत्या. अभिजीत दीपक यांनी म्हटले आहे की, यामागे सत्तेच्या सर्वोच्च पदावरील लोक होते. दीपक यांनी या उच्च पदांच्या प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि विचारले की, जे लोक त्यांच्यासारख्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना अशा धमक्या देतात, त्यांनी ही पदे भूषवावीत का? विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर आणि भाजपने केलेला नकार याबाबत दीपक यांनी सांगितले की, त्यांनी स्वतः बिहारमधील विद्यार्थ्यांना भेट दिली आणि त्यांची विचारपूस केली. ते गंभीर जखमी झाले आहेत. एका विद्यार्थ्याची तर दृष्टी जाण्याचा धोका आहे.

पॅलेट गनपासून ते एके-४७ पर्यंत

या आंदोलनात पॅलेट गनपासून ते एके-४७ पर्यंत सर्व काही वापरले गेले. आम्ही गुन्हेगार आहोत की दहशतवादी? हे विद्यार्थी आणि तरुणांचे आंदोलन होते आणि सरकारने अशा शस्त्रांचा वापर केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना थेट लक्ष्य करत दीपक म्हणाले की, पोलीस केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करतात. त्यामुळे, अशा शस्त्रांचा वापर करणे, विद्यार्थ्यांवर हल्ला करणे आणि लाठीचार्ज करण्याची संपूर्ण जबाबदारी गृहमंत्री यांच्यावर येते.

‘आधी हाडं मोडलात, आता FIR दाखल करताय’; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Web Title: Abhijit deepke makes sensational allegation against amit shah

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • Amit Shah
  • Chhatrapati Sambhajinagar
  • CJP Protest
  • Cockroach Janata Party

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन
1

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात
2

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात

Supreme Court Of India: जंतर मंतर आंदोलनात पेलेट गनचा वापर?   चौकशी समितीत बदलास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
3

Supreme Court Of India: जंतर मंतर आंदोलनात पेलेट गनचा वापर?   चौकशी समितीत बदलास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

सत्ताधारी NDA मध्ये मोठा कलह; ‘या’ मुद्यावरून JDU सह चंद्राबाबू नायडू, पासवानही नाराज
4

सत्ताधारी NDA मध्ये मोठा कलह; ‘या’ मुद्यावरून JDU सह चंद्राबाबू नायडू, पासवानही नाराज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.