Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhijeet Dipke: ‘भाजपामध्ये या नाहीतर…’; CJP प्रमुख अभिजित दीपकेचा खळबळजनक दावा! तर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया समोर…

Abhijit Dipke CJP BJP Offer Allegations: सीजेपी संस्थापक अभिजित दीपके यांनी भाजपची ऑफर नाकारल्याने कुटुंबाला धमक्या मिळाल्याचा आरोप केला आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 30, 2026 | 04:08 PM
Abhijeet Dipke: 'भाजपामध्ये या नाहीतर...'; CJP प्रमुख अभिजित दीपकेचा खळबळजनक दावा! (Photo Credit- X)

Abhijeet Dipke: 'भाजपामध्ये या नाहीतर...'; CJP प्रमुख अभिजित दीपकेचा खळबळजनक दावा! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • ‘भाजपामध्ये या नाहीतर…’
  • CJP प्रमुख अभिजित दीपकेचा खळबळजनक दावा!
  • तर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया समोर…
Abhijit Dipke News: विद्यार्थी आंदोलनामुळे चर्चेत आलेले छत्रपती संभाजीनगर येथील (CJP) चे संस्थापक अभिजित दीपके (Abhijit Dipke) यांनी भारतीय जनता पक्षावर (BJP) अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. आंदोलन सुरू असताना भाजपमध्ये सामील होण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता; मात्र तो नाकारल्याने स्वतःसह कुटुंबाला जीवे मारण्याच्या आणि धमक्यांच्या सत्राला सामोरे जावे लागले, असा दावा दीपके यांनी केला आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत दीपके यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

अभिजित दीपके काय म्हणाले?

अभिजित दीपके म्हणाले की, विद्यार्थी आंदोलनादरम्यान त्यांच्यावर सतत दबाव आणला जात होता. छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना दीपके यांनी दावा केला की, त्यांना भाजपमध्ये सामील होण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, परंतु त्यांनी आपल्या तत्त्वांशी तडजोड करण्यास नकार दिला. यामुळे कथितरित्या धमक्यांची लाट आली. त्यांनी सांगितले की, त्यांचा संघर्ष कोणत्याही राजकीय पदासाठी नसून विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि सुधारित शिक्षणासाठी होता.

कुटुंबाला धमक्या दिल्याचा आरोप

दीपके यांनी आरोप केला की, धमक्या केवळ त्यांनाच नव्हे, तर त्यांच्या आई-वडिलांनाही लक्ष्य करण्यात आले होते. त्यांच्या वडिलांनी असाही दावा केला आहे की, एका व्हिडिओद्वारे कुटुंबाला धमकी देण्यात आली, त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव कुटुंबाला घर सोडून काही काळ नातेवाईकांकडे राहावे लागले.

CJP Protest: १९-२० जुलैच्या मध्यरात्री जंतरमंतर परिसरात दगडांनी भरलेले ट्रक; अभिजित दीपकेंचे व्हिडिओ पुराव्यांसह आरोप

विद्यार्थी आंदोलन दडपण्याचे प्रयत्न

सीजेपी प्रमुख अभिजित दीपक म्हणाले की, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला, परंतु देशभरातील विद्यार्थ्यांच्या पाठिंब्याने आंदोलन अधिक मजबूत झाले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळे सरकारवर दबाव आला आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या मागण्या गांभीर्याने घेतल्या गेल्या.

भाजपने आरोप फेटाळले

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी अभिजीत दीपकेचे आरोप फेटाळले आहेत. हे पूर्णपणे खोटं आहे की भाजपमध्ये प्रवेश करायचा म्हणून धमक्या दिल्या गेल्या. एखादं आंदोलन केलं, त्यांच्या दृष्टीकोनातून ते केलं. आंदोलनाला चेहरा मिळाला. याचा अर्थ वाट्टेल ते बडबड करण्याचा अधिकार हा कुणालाही मिळत नाही. जसं त्याने एक आंदोलन केलं तर ती जबाबदारी अधिक वाढते. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी कोणालाही धमक्या द्याव्या लागत नाहीत. कुठल्याही प्रकारच्या अशा गोष्टी कराव्या लागत नाहीत. किंबहूना भारतीय जनता पार्टीमधून कोणीतरी ऑफर दिली, या आमच्यामध्ये म्हटलं असंही काही नाही. असं कोणी म्हटलं असलं तरी अधीक नीट सांगायला हवं होतं. पण चेहरा मिळाला, प्रसिद्धी मिळाली, नाव मोठं झालं आहे याचा उपयोग करुन भाजपवर टीका करत असेल तर ते जनताही स्वीकारणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.

CJPला परदेशातून फंडिंग मिळत असेल तर अमित शाहांचे अपयश…; अभिजीत दिपकेंचा घणाघात

Web Title: Abhijit dipke cjp bjp offer threat allegations keshav upadhye marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 04:07 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • BJP
  • CJP Protest
  • Maharashtra Political
  • political news

संबंधित बातम्या

‘दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या, नाहीतर मंत्र्यांना फिरू देणार नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारला इशारा
1

‘दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या, नाहीतर मंत्र्यांना फिरू देणार नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारला इशारा

PCMC Politics: पिंपरी-चिंचवड पालिकेत ‘तारीख पे तारीख’; महापौरांनी सभा १५ ऑक्टोबरपर्यंत का केली तहकूब?
2

PCMC Politics: पिंपरी-चिंचवड पालिकेत ‘तारीख पे तारीख’; महापौरांनी सभा १५ ऑक्टोबरपर्यंत का केली तहकूब?

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!
3

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन
4

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.