Abhijeet Dipke Replied Ramdev Baba: “संविधानाच्या रस्त्यावर चालून विरोध प्रदर्शन करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो घेऊ जय भीमचे नारे देणे, महात्मा गांधींचे फोटो घेऊन आंदोलन करणे हे संस्कृती बदनाम करण्यासारखे आहे, तर हो आम्ही संस्कृती बदनाम करत आहोत. तुम्ही जे पतंजलीचे जे उत्पादने बनवत आहात, त्याकडे लक्ष केंद्रीत करा”. अशा शब्दांत कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी रामदेव बाबांना प्रत्युत्तर दिले आहे.
संस्कृती, लोकशाही आणि देश जेन-झी बऱ्यापैकी सांभाळून घेऊ शकतात, असे मला वाटते. रामदेव बाबांनी पतंजली जे फॉल्टी प्रॉडक्ट्स आहेत त्याकडे लक्ष द्या नाहीतर ते बंद पडून जातील. असा टोला अभिजीत दिपके यांनी रामदेव बाबांना लगावला आहे.
आज सकाळी माध्यमांशी बोलताना अभिजीत दिपके यांनी माध्यमांशी संवाद साधला. येत्या काही दिवसांत सीजेपीकडून शेतकरी संघटनांना पाठिंबा दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यावर बोलताना अभिजीत म्हणाले की, शेतकऱ्यांची मुलांचेही शिक्षण सुरू आहे. त्यांचीही मुले स्पर्धा परीक्षा देत आहेत. शेतकरी संघटना, युनियन यांच्याकडून आम्हाला खूप मोलाचा पाठिंबा मिळाला आहे. जेव्हा आम्हाला गरज होती त्यावेळी ते आमच्या सोबत होते. इथून पुढे जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना आमची गरज असेल त्यावेळी आम्हीदेखील त्यांच्यासोबत उभे राहू.
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत गृहमंत्री अमित शाहांनी राजीनामा द्यायला पाहिजे असे विधान केले. असे पत्रकारांनी विचारले असता अभिजीत म्हणाले की, हो त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, आमच्या आंदोलनावेळी सीजेपीला बाहेरुन, परदेशातून फंडिंग मिळत असल्याचे आरोप केले गेले, मग अमित शाहा गृहमंत्री असतानाही हे सर्व कसं शक्य झालं,सीजेपी बाहेरून चालत आहे, सीजेपीला परदेशातून फंडिंग मिळत असेल तर, हे अमित शाहांचेच अपयश आहे, मग हे कसले चाणक्य, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
२० जुलैला ज्या प्रकार दिल्ली पोलिसांच्या लाठीचार्जमधून विद्यार्थ्याना माराहाण करण्यात आली, त्यांचं रक्त सांडलं हे अमित शाहांच्या आदेशाशिवाय होऊ शकत नाही. असंही त्यांनी नमुद केलं. प्रियांका गांधी यांनी नवे शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशींबाबत विचारण्यात आले. त्यावर, मी त्यांची एक क्लिप पाहिली. ज्याप्रकारे बिलकीस बानो यांच्य बलात्काऱ्यांचे स्वागत केले होते. जर देशाचे शिक्षणमंत्रीच बलात्काऱ्याचे स्वागत करत असेल, त्याचे कौतुक करत असेल, धर्मेद्र प्रधान यांना काढून आणखी एक विचीत्र माणूस बसवून ठेवलाय असे दिसते. बलात्काऱ्यांचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीला शिक्षण मंत्रीपद देऊन तुम्ही देशाला काय संदेश देत आहात, असा सवालही अभिजीत यांनी उपस्थित केला.
पण हे लोक दुसरं करणार तरी काय, कुलदिप सेंगर कोण होता, यांच्या सत्तेत राम रहिम पेरोलवर बाहेर येऊ शकतात, तर गुंड आणि बलात्काऱ्यांचे समर्थन करणारे हे सरकार आहे. अशी टिकाही त्यांनी यावेळी केली. झेनझी ना ट्रोल करून तुम्हाला काय मिळणार आहे, आज जी मुले १५ ते २८ च्या वयोगटातील आहेत. तीच मुले उद्या जाऊन मतदार बनणार आहे, हीच मुले उद्या देश चालवणार आहे, मग तुम्ही त्यांना ट्रोल का करताय, असा सवालही अभिजीत यांनी उपस्थित केला.






