Abhijeet Dipke Allegation१९-२० जुलैच्या मध्यरात्री जंतरमंतर परिसरात दगडांनी भरलेले ट्रक; अभिजित दीपकेंचे व्हिडिओ पुराव्यांसह आरोप
पण संसद मार्गावरील मोर्चापूर्वी जंतरमंतरवर घडलेल्या काही गंभीर घडामोडींकडे आज सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी लक्ष वेधले आहे. त्याचवेळी थेट दिल्ली पोलिस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवरदेखील गंभीर आरोप केले आहेत. आज सकाळी माध्यमांशी बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की, “१९ च्या रात्री आणि २० तारखेच्या पहाटे साडेपाच वाजता आंदोलनापूर्वी जंतरमंतरच्या परिसरात दगडांनीभरलेले ट्रक उभे करण्यात आले होते. हे ट्रक मी स्वत:हून पाहिले होते. इतकेच नव्हे तर एक डॅमेज झालेली व्हॅन देखील तिथे उभी केलेली होती. जेव्हा मी पोलिसांना विचारले होते, त्याचा व्हिडीओदेखील मी काढून ठेवला होती. ती डॅमेज झालेली व्हॅनदेखील पोलिसांनी आधीच तिथे आणून ठेवली होती. म्हणजे विद्यार्थ्यांनी दगडफेक केली, हा सांगता यावे, दगडफेकीचे हे प्लॅनिंग पूर्णपणे दिल्ली पोलिसांचे होते.
मला शंका आल्यावर मी थेट डीसीपींना विचारलं तर त्यांनी तो ट्रक एमसीडीचा असून तुम्ही निश्चिंत राहा असे सांगितले, पण मी म्हणालो तुम्ही दुसऱ्यांना वेड्यात काढा आम्हाला माहिती आहे. दिल्ली पोलिस अमित शाहांचे आदेश फॉलो करत आहेत. दगडांनी भरलेले ट्रक, तोडफोड केलेली व्हॅन आधीच आंदोलनाच्या स्थळी उभे करण्यात आले. तेच बीजेपीच गुंड येतात आणि तेच दगडांनी भरलेल्या ट्रकमधील दगड घेतात आणि पोलिसांवरच फेकतात. आरोप सगळे विद्यार्थ्यांवर करण्यात आले. पोलिस आणि भाजपच्या गुंडांनी हे सुनियोजितपणे हे झालं.
ही पहिलीच वेळ नाही जेव्हा जेव्हा दिल्लीत आंदोलने झाली त्यावेळी भाजप आणि दिल्ली पोलिसांचे संगनमत कसे असते ते वेळोवेळी दिसून आले आहे. हे सुरूच राहणार आहे. देशातील पोलिस हे बीजेपीच्या दबावाखाली चालणारे पोलिस आहेत, संघाचे कार्यकर्ते असल्यासारखं वागण पोलिसांनी सोडून द्यावे आणि तसं वागायचं असेल तर त्यांची पॅन्ट घालून संघात जा,अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत गृहमंत्री अमित शाहांनी राजीनामा द्यायला पाहिजे असे विधान केले. असे पत्रकारांनी विचारले असता अभिजीत म्हणाले की, हो त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, आमच्या आंदोलनावेळी सीजेपीला बाहेरुन, परदेशातून फंडिंग मिळत असल्याचे आरोप केले गेले, मग अमित शाहा गृहमंत्री असतानाही हे सर्व कसं शक्य झालं,सीजेपी बाहेरून चालत आहे, सीजेपीला परदेशातून फंडिंग मिळत असेल तर, हे अमित शाहांचेच अपयश आहे, मग हे कसले चाणक्य, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. २० जुलैला ज्या प्रकार दिल्ली पोलिसांच्या लाठीचार्जमधून विद्यार्थ्याना माराहाण करण्यात आली, त्यांचं रक्त सांडलं हे अमित शाहांच्या आदेशाशिवाय होऊ शकत नाही. असंही त्यांनी नमुद केलं.
Shame on Delhi Police! A truck loaded with stones and a wrecked van have already been placed at Jantar Mantar. Soon, the Godi media will run stories claiming that the protesters vandalised the van to defame this peaceful protest. pic.twitter.com/5ZOPOLHm8v — Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) July 20, 2026






