Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aditya Thackeray : विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या; आदित्य ठाकरे यांचे पोलीस महासंचालकांना पत्र

नीट पेपरफुटी आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयाची राज्यभर तातडीने आणि एकसमान अंमलबजावणी व्हावी, यासाठी खासदार आदित्य ठाकरे यांनी पोलीस महासंचालकांना सविस्तर पत्र पाठवले आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 01, 2026 | 08:33 PM
Aditya Thackeray : विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या; आदित्य ठाकरे यांचे पोलीस महासंचालकांना पत्र

Aditya Thackeray : विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या; आदित्य ठाकरे यांचे पोलीस महासंचालकांना पत्र

Follow Us
Follow Us:
  • विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत आदित्य ठाकरे यांचे पत्र
  • कार्यपद्धती, कालमर्यादा आणि एसओपीबाबत सात प्रश्न उपस्थित
  • निर्णयाची राज्यभर तातडीने आणि एकसमान अंमलबजावणीची मागणी
 

नीट पेपरफुटीविरोधात राज्यभर झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक (DGP) यांना सविस्तर पत्र लिहिले आहे. शासनाने विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही नोटिसा बजावल्या जात आहेत आणि काही प्रकरणांमध्ये तपास सुरू असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक भवितव्यावर अशा प्रकरणांचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शासनाने घेतलेल्या निर्णयाची राज्यभर एकसमान आणि तात्काळ अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. गुन्हे मागे घेण्यासाठी निश्चित कार्यपद्धती आणि कालमर्यादा जाहीर करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे.

पत्रामध्ये त्यांनी सात महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. गृहविभागाच्या निर्देशांचा लाभ राज्यातील सर्व विद्यार्थी आंदोलनांशी संबंधित गुन्हे, एफआयआर आणि न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांना लागू होणार का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच भारतीय न्याय संहिता किंवा इतर कायद्यांतर्गत नोटिसा बजावण्यात आलेल्या अथवा तपास सुरू असलेल्या विद्यार्थ्यांवरील पुढील तपास आणि दंडात्मक कारवाई तात्पुरती स्थगित केली जाणार का, याबाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मागितली आहे.

अभिजीत दिपके यांच्या भेटीवरून महायुतीत खळबळ? बच्चू कडू, संजय शिरसाट यांची एकनाथ शिंदेंकडून कानउघडणी

याशिवाय गुन्हे मागे घेण्याची अधिकृत प्रक्रिया काय असेल, संबंधित पोलीस ठाणे स्वतःहून प्रस्ताव पाठवणार की विद्यार्थी अथवा त्यांच्या वकिलांना स्वतंत्र अर्ज करावा लागणार, याबाबतही त्यांनी स्पष्टीकरण मागितले आहे. न्यायालयात प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांबाबत सरकारी अभियोक्त्यामार्फत अर्ज दाखल केला जाणार का आणि त्यासाठी कोणती कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे, याचाही त्यांनी पत्रात उल्लेख केला आहे.

राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि पोलीस ठाण्यांना यासंदर्भात एकसमान परिपत्रक किंवा मानक कार्यपद्धती (SOP) जारी करण्यात आली आहे का, तसेच ती सार्वजनिक करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांवर अद्याप अटक, चौकशी, हजेरी किंवा इतर कोणत्याही प्रकारची कारवाई सुरू आहे, त्यांच्याबाबत तातडीने स्पष्ट निर्देश देण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

‘राज ठाकरेंच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढण्याची गरज’; अमित साटमांचा जोरदार पलटवार

नीट पेपरफुटी आंदोलनानंतर विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा शासनाचा निर्णय प्रत्यक्षात प्रभावीपणे राबविला गेला पाहिजे. केवळ घोषणांपुरता मर्यादित न राहता राज्यातील प्रत्येक संबंधित विद्यार्थ्याला त्याचा लाभ मिळावा, यासाठी पोलीस प्रशासनाने स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, अशी अपेक्षा आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली आहे.

Web Title: Aditya thackeray letter dgp neet protest student cases withdrawal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 08:33 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • CJP Protest
  • Maharashtra Police
  • neet paper leak

संबंधित बातम्या

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले
1

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले

Aaditya Thackeray : ‘मी दिशा सालियनला… सत्‍य बदलू शकत नाही…’ आदित्‍य ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं
2

Aaditya Thackeray : ‘मी दिशा सालियनला… सत्‍य बदलू शकत नाही…’ आदित्‍य ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं

Aditya Thackeray News: दिशा सालियान प्रकरणावरून चर्चेत आलेले आदित्य ठाकरे किती शिकलेत? जाणून घ्या शिक्षण अन् एकूण संपत्ती
3

Aditya Thackeray News: दिशा सालियान प्रकरणावरून चर्चेत आलेले आदित्य ठाकरे किती शिकलेत? जाणून घ्या शिक्षण अन् एकूण संपत्ती

Disha Salian Case : ‘आदित्य ठाकरे रात्री 12 वाजता कुठे जायचे?’; दिशा सालियन प्रकरणावर रामदास कदमांचा गंभीर आरोप
4

Disha Salian Case : ‘आदित्य ठाकरे रात्री 12 वाजता कुठे जायचे?’; दिशा सालियन प्रकरणावर रामदास कदमांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.