Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Disha Salian Case : ‘आदित्य ठाकरे रात्री 12 वाजता कुठे जायचे?’; दिशा सालियन प्रकरणावर रामदास कदमांचा गंभीर आरोप

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. सीबीआय तपासाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.

  • By विवेक
Updated On: Sep 14, 2026 | 07:40 PM
दिशा सालियन प्रकरणावर रामदास कदमांचा गंभीर आरोप

दिशा सालियन प्रकरणावर रामदास कदमांचा गंभीर आरोप

Follow Us
Follow Us:
  • ‘आदित्य ठाकरे रात्री 12 वाजता कुठे जायचे?’ असा रामदास कदमांचा सवाल
  • ‘पुरावे नष्ट झाले का?’ याची चौकशी करण्याची मागणी
  • दिशा सालियन प्रकरणात सखोल तपासाची रामदास कदमांची मागणी
 

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.

रामदास कदम यांनी ‘सत्यमेव जयते’चा उल्लेख करत न्यायालयाच्या माध्यमातून या प्रकरणाला पुढे जाण्याचा मार्ग मिळाल्याचं म्हटलं. दिशा सालियन यांच्या मृत्यूशी संबंधित सर्व बाजूंची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

‘पुरावे नष्ट झाले का?’ कदमांचा सवाल

रामदास कदम यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्या काळात या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यात आले का? याची चौकशी झाली आहे का? असा सवाल त्यांनी केला.

Manoj Jarange Patil : ‘हे दिवस आंदोलनाचे नाहीत’; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बावनकुळेंची जरांगेंना विनंती

दिशा सालियन यांच्या वडिलांनी आदित्य ठाकरे यांचं नाव घेतल्याचा दावा करत कदमांनी या प्रकरणात अधिक सखोल तपासाची मागणी केली. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई सुरू झाल्याचंही त्यांनी म्हटलं.

‘आदित्य ठाकरे रात्री 12 वाजता कुठे जायचे?’

आदित्य ठाकरे यांच्या कथित नाईट लाइफवरूनही रामदास कदमांनी सवाल उपस्थित केला. ‘आदित्य ठाकरे रात्री बारा वाजता कुठे जायचे आणि सकाळी सहा वाजता कुठून यायचे?’ असा प्रश्न त्यांनी विचारला. याचवेळी कदमांनी ‘बाळासाहेबांनी कमावलं आणि या लोकांनी गमावलं’, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांच्यावर केली.

दरम्यान, रामदास कदम यांनी मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनावरही भाष्य केलं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच जरांगेंची भूमिका आहे, मात्र सणासुदीचे दिवस असल्याने त्यांनी संयम ठेवावा, असं कदम म्हणाले. आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये, ही सरकारची भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

3 हजार कोटींचा मालक आमदार बनला रस्त्यावरचा भिकारी ! मुंबईतील भाजप आमदाराचा भीक मागतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं कारण काय?

Web Title: Disha salian case ramdas kadam aditya thackeray serious allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • Disha Salian case
  • Ramdas Kadam

संबंधित बातम्या

Disha Salian Case: सहा वर्षांनंतर दिशा सालियान प्रकरणाला नवं वळण; CBIने दाखल केली FIR, वडिलांची चार तासांहून अधिक चौकशी
1

Disha Salian Case: सहा वर्षांनंतर दिशा सालियान प्रकरणाला नवं वळण; CBIने दाखल केली FIR, वडिलांची चार तासांहून अधिक चौकशी

Aaditya Thackeray : ‘दुसऱ्यावर धर्म लादणं ही हिंसाच!’ मिरा-भाईंदरच्या शाळेत कांदा-लसूण बंदी; आदित्य ठाकरे संतापले
2

Aaditya Thackeray : ‘दुसऱ्यावर धर्म लादणं ही हिंसाच!’ मिरा-भाईंदरच्या शाळेत कांदा-लसूण बंदी; आदित्य ठाकरे संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.