
After Ajit Pawar who next DCM of Maharashtra Sunetra Pawar Jay or Parth
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले अजित पवार यांचे निधन झाले आहे. त्यामुळे बारामतीमध्ये आता त्यांची जागा कोण घेणार याची चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार यांचा उत्तराधिकारी कोण? आणि तसेच भाजपसोबत गेलेल्या त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे काय होणार? असे प्रश्न निर्माण झाले आहे. भाजपसोबत सत्तेमध्ये असलेले हे नेते पुन्हा शरद पवार यांच्यासोबत जाणार की अजित पवार यांच्या पक्षाला नवे नेतृत्व मिळणार याची चर्चा सुरु झाली आहे.
हे देखील वाचा : ४ दिवसापूर्वीचा ‘दादांचा’ नांदेडचा दौरा शेवटचा! ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाला होते उपस्थित
दरम्यान, उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचे नाव आघाडीवर आहे. अजित पवार यांच्या पत्नी असलेल्या सुनेत्रा पवार या अजित पवारांनंतर उपमुख्यमंत्रिपद सांभाळतील अशी अपेक्षा समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. सुनेत्रा पवार या सध्या राज्यसभा खासदार देखील आहेत. तसेच राष्ट्रवादीमधील दुसऱ्या नेत्याला राज्यसभा खासदारकीची संधी देत सुनेत्रा पवार महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रतील राजकारण सोडून सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उतरणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हे देखील वाचा : Ajit Pawar funeral live : अजित पवारांना अखेरचा निरोप! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दाखल
त्याचबरोबर प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ यांनी देखील सुनेत्रा पवारांची भेट घेतली आहे. त्य़ामुळे राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री पदाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. अजित पवार यांचे दोन्ही पुत्र जय पवार आणि पार्थ पवार यांची नावे देखील चर्चेत आहेत. मात्र दोन्ही पुत्रांना सक्रीय राजकारणाचा जास्त अनुभव नसल्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या नावाच्या चर्चेने जोर धरला आहे.