Maharashtra Politics: मुंबईच्या चर्चेवेळी अधिकारी गायब; विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांची नगरविकास सचिवांना नोटीस rahul-narwekar-notice-to-urban-development-secretary-absent-officers मुंबईशी संबंधित महत्वाच्या विषयांवर विधानसभेत चर्चा सुरू असताना मुंबई महापालिका असेल किंवा नगरविकास सचिव तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याच्या मुददयावरून सत्ताधारी तसेच विरोधी आमदारांनी आक्रमक होत तक्रार केली, संबंधित अधिका-यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी दोन्ही बाजूंनी करण्यात आली. त्यावर याची दखल मी घेतली असून नगरविकास सचिवांना मी ताबडतोब नोटीस जारी करत असल्याचे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. विधानसभेत सत्ताधारी पक्षाकडून नियम २९३ अन्वये प्रस्ताव मांडण्यात आला होता. मुंबई महापालिका तसेच ठाणे व कल्याण महापालिकेशी संबंधित विविध विषयांवर यामाध्यमातून चर्चा सुरू होती. मात्र या महत्वाच्या चर्चेच्या वेळी अधिकारी गॅलरीमध्ये एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता. कायद्यांची अमलबजावणी करणारेच गायब होतात भाजपच्या अतुल भातखळकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सत्ताधारी पक्षाने नियम २९३ चा प्रस्ताव मांडला आहे, पण महापालिका असेल वा नगरविकास असेल एकही संबंधित अधिकारी अधिकारी गॅलरीत उपस्थित नसल्याचे ते म्हणाले. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या अधिवेशनात हा मुद्दा नवव्यांदा आला आहे. हे सभागृह सर्वोच्च सभागृह आहे. आपण कायदे करतो, अर्थसंकल्प मंजूर करतो. या अधिका-यांचे पगार आपण मंजूर करती पण अधिकारी उपस्थितच नसतात. अधिकाऱ्यांना वाटते हे कामकाज त्यांचे नाही. अधिकाऱ्यांना वाटते हे कामकाज त्यांचे नाही नाना पटोले म्हणाले, या अधिकाऱ्यांना वाटते हे कामकाज त्यांचे नाही. चेंबूरला एका निर्दोष बालकाचा मृत्यू झाला. मान्सूनपूर्व तयारीचे पैसे खर्च करूनही त्या बालकाचा मृत्यू झाला. संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित केली पाहिजे, सरकारचा वचकच प्रशासनावर उरलेला नाही. हा केवळ सभागृहाचा नाही तर राज्यातील १४ कोटी जनतेचा अपमान हे अधिकारी करत आहेत. जयंत पाटील यांनी या अधिका-यांना आता सभागृहाची किमत राहिलेली नाही. राज्य त्याचेच आहे, असे त्यांना वाटते, जे गैरहजर असतील त्यांना किमान तीन दिवस निलंबित करा अशी मागणी केली. तालिका अध्यक्ष समाधान आवताडे यांनी यावेळी सभागृह सुरू असताना आयुक्त किवा संबंधित अधिकारी उपस्थित राहणे आवश्यक होते. या आधी दोन वेळा लेखी खुलासा मागविला आहे. संबंधित अधिका-याकडून लेखी खुलासा मागवत आहोत. Rahul Narwekar, Maharashtra Assembly, UD Secretary Notice, Mumbai BMC Discussion, Absent Officers Assembly, Rule 293 Motion, Sudhir Mungantiwar, Atul Bhatkhalkar
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेतील अलीकडील निवडणुकांनंतर भाजपची ताकद आणखी वाढली असून, वरिष्ठ सभागृहात भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून प्रभावी स्थितीत पोहोचला आहे. सध्या विधान परिषदेच्या ७८ पैकी ७३ जागा भरलेल्या असून, त्यापैकी ३५ सदस्य एकट्या भाजपचे आहेत. आगामी काळात पक्षाचे संख्याबळ आणखी वाढत जाणार असल्याने विधेयक मंजूर करताना भाजपची भूमिका निर्णायक ठरणार आहे. तसेच मित्रपक्षांवरील त्यांचे अवलंबित्वही मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.
१५ व्या विधानसभेत भाजपचे १३२ आमदार असून, काही अपक्ष व समर्थक ७ आमदारांचा पाठिंबाही पक्षाला आहे. त्यामुळे विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांत भाजपचे राजकीय वजन वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. आगामी काळात विधिमंडळातील निर्णय प्रक्रियेत भाजपचा प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त ५ जागा अद्याप रिक्त आहेत. यापैकी ३ जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पक्षाचे संख्याबळ ३५ वरून ३८ वर पोहोचेल.
याशिवाय, वर्षअखेरीस पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या ५ जागांसाठी निवडणुका आहेत. या पाचपैकी ३ जागा जरी भाजपच्या खात्यात गेल्या, तरी पक्षाची सदस्यसंख्या ४० च्या पुढे जाऊ शकते.
17 सदस्यांचा विधान परिषदेत शपथविधी
विधान परिषदेच्या १७ नवनिर्वाचित सदस्यांनी सभागृहात सभापती राम शिंदे यांच्या हस्ते शपथ घेतली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, मंत्री उपस्थित होते. विधान परिषदेच्या १६ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांसाठी आणि नागपूरमधील रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक झाली. यापैकी १६ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी नाशिकची जागा जिंकली, ज्या जागेमुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र, गोकुळ गीते आता शिंदे गटात सहभागी झाले आहेत.
राम सातपुते यांच्यासह अनेकांनी घेतली शपथ
नवनिर्वाचित सदस्य प्राजक्ता तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे-पाटील, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, राजेंद्र काकडे, गोविंद पाटील, डॉ. राजीव पोतदार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन, सुहास शिरसाट यांना राम सातपुते यांनी सदस्यत्वाची शपथ दिली.






