Tumbadchi Manjula: तुंबाडची मंजुळामधील गोंधळाला ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Tumbbadchi Manjula Movie: एका तरुणाने आपली झालेली फजिती सावरण्यासाठी केलेली एक छोटीशी खोटी गोष्ट पुढे जाऊन चक्क अलौकिक गोंधळाचं रूप घेते आणि संपूर्ण गावात एकच खळबळ उडते. तुंबाडची मंजुळामधील पाच लक्षवेधी पात्रं या सगळ्या गोंधळाला आणखी रंगत आणतात. केशवने रचलेला भूतबाधेचा बनाव, रवी अण्णांचा गावातील दबदबा आणि गुरूजींचा अंधश्रद्धेवरचा विश्वास, या सगळ्यांमुळे ही कथा एका साध्या खोट्या गोष्टीपासून गावभर पसरलेल्या अफवा आणि गोंधळापर्यंत पोहोचते. विनोद, गोंधळ आणि भावनिक पदर यांचा सुरेख मेळ साधणारी ही पात्रं तुंबाडची मंजुळाला एक मजेशीर अनुभव बनवतात. Marathi Zee 5 वर एक्सक्लुझिव्ह स्ट्रीमिंग होत असलेल्या या चित्रपटातील ही पाच गोंधळखोर पण लक्षवेधी पात्रं पाहा.
केशव हा एक तरुण आहे, जो एका लाजिरवाण्या प्रसंगातून स्वतःची सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात अपेक्षेपेक्षा मोठ्या संकटात अडकतो. ओम भुतकरने साकारलेला केशव स्वभावाने उतावळा, खोडकर आणि अडचणीत सापडला की त्यातून मार्ग काढण्यासाठी काहीतरी भन्नाट कल्पना सुचवणारा आहे. मात्र, त्याने सांगितलेल्या गोष्टीला जेव्हा वेगळंच वळण मिळतं, तेव्हा त्याला आजूबाजूला घडणाऱ्या अधिकाधिक विचित्र परिस्थितींचा सामना करावा लागतो. चित्रपटातील अनेक विनोदी आणि गोंधळाच्या प्रसंगांच्या केंद्रस्थानी केशवच आहे. Tumbadchi Manjula:
रवी अण्णा हे गावातील विश्वासाचं आणि दबदब्याचं व्यक्तिमत्त्व आहे. गावात कोणतीही अडचण आली की ज्याच्याकडे लोक धाव घेतात, अशी त्यांची प्रतिमा आहे. जितेंद्र जोशी यांनी साकारलेले रवी अण्णा आत्मविश्वासू, प्रभावशाली आणि आपल्या शब्दाला महत्त्व मिळण्याची सवय असलेले आहेत. केशवसोबतचं त्यांचं नातं चित्रपटातील काही मजेशीर प्रसंगांची पार्श्वभूमी तयार करतं, तर शोभासोबतचा त्यांचा भूतकाळ त्यांच्या व्यक्तिरेखेला आणखी एक वेगळी बाजू देतो.
सई ताम्हणकरने साकारलेली शोभा ही शांत आणि अबोल स्वभावाची स्त्री आहे, जिचं आयुष्य तिच्या आजूबाजूला घडणाऱ्या विचित्र घटनांशी अनपेक्षितपणे जोडले जातं. मंजुळाची मुलगी असल्याने आईच्या कथित अस्तित्वाभोवती सुरू झालेल्या चर्चांमध्ये तीही ओढली जाते. गावकरी ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर लगेच विश्वास ठेवत असताना, शोभा या सगळ्या गोंधळाकडे अधिक वास्तववादी आणि संयमी दृष्टिकोनातून पाहते. तिच्या व्यक्तिरेखेमुळे या विनोदी कथानकाला एक भावनिक पदरही मिळतो.
करुणाकर गुरूजी हे गावातील तांत्रिक असून मंजुळाभोवती निर्माण झालेल्या गूढ परिस्थितीला ते गांभीर्याने घेतात. मकरंद अनासपुरे यांनी साकारलेले गुरूजी अलौकिक गोष्टींबाबतच्या आपल्या ज्ञानावर आणि समजुतीवर पूर्ण विश्वास ठेवतात.
परिस्थितीबाबतचा त्यांचा अंदाज आणि त्याची मांडणी गावकऱ्यांना या सगळ्या घटनांवर विश्वास ठेवण्यासाठी आणखी एक कारण देते. त्यामुळे वाढत जाणाऱ्या गोंधळात गुरूजींची भूमिका महत्त्वाची ठरते आणि चित्रपटातील विनोदालाही एक वेगळीच रंगत मिळते.
उषा नाडकर्णी यांची आजी तुम्बाडची मंजुळाच्या रंगतदार विश्वातील आणखी एक लक्षवेधी व्यक्तिरेखा आहे. आपल्या ठसकेबाज व्यक्तिमत्त्वामुळे त्या गावातील या मोठ्या आणि रंगीबेरंगी पात्रांच्या समूहात सहज उठून दिसतात. अफवा, समजुती आणि त्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रिया सतत वाढत जात असताना, आजीची व्यक्तिरेखाही या सगळ्या गोंधळात आपली वेगळी छाप सोडते आणि परिस्थिती आणखी मनोरंजक बनवते.
केशवचा उतावळेपणा, रवी अण्णांचा दबदबा, शोभाचा संयमी दृष्टिकोन, गुरूजींचा अलौकिक शक्तींवरचा विश्वास आणि आजीचं ठसकेबाज व्यक्तिमत्त्व — या पाचही व्यक्तिरेखा तुम्बाडची मंजुळामधील गोंधळाला आपापल्या पद्धतीने रंगत आणतात.
तुंबाडची मंजुळा आता फक्त Marathi Zee 5 वर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे!






