Ahilyanagar AIMIM Muslim women speech Jai Shivaji slogan viral news
Ahilyanagar Muslim Women Leader : अहिल्यानगर : एआयएमआयएमच्या वतीने अहिल्यानगरमधील गुरुवारी (दि.09) मुकुंदनगर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पक्षाच्या सभेतील महिला पदाधिकारी असलेल्या रुहीनाज शेख यांची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. रुहीनाज यांनी आपल्या भाषणाची सुरुवात “जय शिवराय” आणि जय भीम या जयघोषाने केली, त्यांच्या या घोषणेमुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. यावर त्यांनी घोषणा देण्याची कारणे देखील सांगितली आहेत.
सोशल मीडियावर एआयएमआयएमच्या या महिला नेत्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या मुस्लिम महिला नेत्याचे नाव रुहीनाज शेख असे आहे. रुहीनाज शेख यांनी तडफदार आवाजामध्ये भाषणाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला जय शिवराय आणि जय भीम अशी घोषणा दिली. त्यांनी ही घोषणा दिल्यानंतर उपस्थितांच्या मनात प्रश्न निर्माण झाले असावेत, हे ओळखून त्यांनी भाषणातच याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. “एक बुरखेवाली इथे आल्यानंतर ‘जय शिवराय’ कसं म्हणू शकते, असं काहींना वाटलं असेल. पण छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका जातीचे नव्हते. त्यांनी 12 बलुतेदार आणि अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं. त्यामध्ये मुस्लीम समाजही होता,” अशा शब्दांत एआयएमआयएम महिला नेत्या रुहीनाज शेख यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन स्वराज्यनिर्मितीचा उल्लेख केला. त्याचबरोबर सध्याच्या राजकारणात सुरु असलेल्या जातीय आणि धर्मीय राजकारणावर टीका केली. रुहीनाज शेख म्हणाले की, “आज काही लोक समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मुस्लिम समाजाला वेगळं करण्याचा प्रयत्न चालतोय. पण आम्ही इथून एक इंचही हटणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. रुहीनाज शेख यांच्या भाषणाची आता जोरदार चर्चा रंगली आहे.
अशा नेतृत्वाची तुम्ही स्तुती करता?
याच सभेमध्ये एआयएमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदी हे डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांची स्तुती करतात. मी त्यांचा निषेध करतो. नेतान्याहू याने 60 हजार लोकांचा खून केला. त्यामध्ये 20 बालके तर 20 हजार महिला आहेत. त्याने लाखो लोकांना बेघर केलं. अशा नेतृत्वाची तुम्ही स्तुती करता? असा सवाल उपस्थित करत असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तर मराठवाड्यात आलेल्या पुरावर बोलताना ओवैसी म्हणाले की, “महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं. पण देवेंद्र फडणवीसांनी मोठं मोठे आकडे सांगत आहेत. देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदींप्रमाणेच खोटं बोलतात. खरंतर देवेंद्र फडणवीस यांनी मोदींकडे जाऊन बसले पाहिजे आणि राज्यातील शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी केली पाहिजे,” असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.