Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Narayan Rane : महायुतीमध्ये खडाजंगी! अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याच्या नारायण राणेंनी घेतला समाचार

महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचा मुद्द्यावरुन राजकारण सुरु असताना मुस्लीम समाजाबाबत देखील वक्तव्य केली जात आहेत. अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर नारायण राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 23, 2025 | 11:40 AM
ajit pawar vs narayan rane on muslim community statement

ajit pawar vs narayan rane on muslim community statement

Follow Us
Follow Us:

मुंबई : सध्या रमजानचा महिना सुरु आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईमध्ये एका इफ्तार पार्टीमध्ये सहभाग घेतला. यावेळी त्यांनी हिंदू मुस्लीम एकात्मेबाबत वक्तव्य केले. रमजानचे बंधुत्वाचा संदेश देणारा महिना म्हणून वर्णन केले. जर कोणी त्यांच्याकडे डोळे वटारून पाहण्याचे धाडस केले तर ते त्याला सोडणार नाहीत, असे मुस्लीम समाजाला आश्वासन देताना अजित पवार यांनी वक्तव्य केले. यावरुन आता महायुतीमध्ये खडाजंगी सुरु आहे.

अजित पवार यांनी जर कोणी त्यांच्याकडे डोळे वटारून पाहण्याचे धाडस केले तर ते त्याला सोडणार नाहीत केलेले वक्तव्य हे अप्रत्यक्षपणे नितेश राणे यांना टोला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या होत्या. नितेश राणे यांनी अनेकदा मुस्लीम समाजाला आव्हान देणारी वक्तव्य केली आहेत. यानंतर आता खासदार नारायण राणे यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये पवार विरुद्ध राणे असा संघर्ष निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

काय म्हणाले नारायण राणे?

खासदार नारायण राणे यांनी देखील अजित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्या भूमिकेवर महायुतीमधून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस आणि दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांच्यानंतर खासदार नारायण राणे यांनीही अजित पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली असून, “अजित पवारांनी डोळे तपासण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे असं वाटतं”, असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अजित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अजित पवार काय म्हणाले हे मला माहिती नाही, कोणत्याही जाती किंवा धर्मातील चांगले काम करणाऱ्या आणि देशभक्त व्यक्तीला त्रास दिला आणि दोषी आढळला तर त्याला सोडले जाणार नाही.” असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले होते.

काय म्हणाले होते अजित पवार?

त्यांनी मुस्लिम समुदायाला आश्वासन दिले की भारत विविधतेत एकतेचे प्रतीक आहे. आपण कोणत्याही फुटीरतावादी शक्तींच्या जाळ्यात अडकू नये. आपण नुकतीच होळी साजरी केली आहे, गुढीपाडवा आणि ईद येत आहेत – हे सर्व सण आपल्याला एकत्र राहण्यास शिकवतात. आपण सर्वांनी मिळून तो साजरा केला पाहिजे, कारण एकता हीच आपली खरी ताकद आहे. मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की तुमचे भाऊ अजित पवार तुमच्यासोबत आहेत. जो कोणी आपल्या मुस्लिम बंधू-भगिनींना आव्हान देण्याचे धाडस करेल, जर कोणी दोन गटांमध्ये भांडण निर्माण करण्याचा आणि कायदा आणि सुव्यवस्था स्वतःच्या हातात घेण्याचा प्रयत्न करेल, तो कोणीही असो – त्याला सोडले जाणार नाही, त्याला माफ केले जाणार नाही, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते.

Web Title: Ajit pawar vs narayan rane on muslim community statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2025 | 11:40 AM

Topics:  

  • ajit pawar
  • devendra fadnavis
  • Narayan Rane

संबंधित बातम्या

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी
1

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
2

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

Amol Kolhe News:  सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं
3

Amol Kolhe News: सत्ताधाऱ्यांकडून सोबत येण्याची ऑफर आली का? अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सुरुवातीला ८ तास, पुढे १२ तास दिवसा वीज देणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
4

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सुरुवातीला ८ तास, पुढे १२ तास दिवसा वीज देणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.