Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“लालकृष्ण अडवाणींच्या लढ्याला भाजपात शून्य महत्त्व”; अंबादास दानवे नेमकं म्हणाले काय?

राज्याच्या राजकारणामध्ये रोज नवीन उलाढाल होत आहेत. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी देखील होत आहे. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 12, 2025 | 12:21 PM
Thackeray group aambadas danve write open letter to shivsainik on Shivsena vardhapan din 2025

Thackeray group aambadas danve write open letter to shivsainik on Shivsena vardhapan din 2025

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण तापले आहे. निवडणुकीमध्ये महायुतीचा एकतर्फी विजय झाला. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला असून मित्रपक्षांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे अनेक नेते हे नाराज असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. यामध्ये आता ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. अंबादास दानवे यांनी लिहिले आहे की, शस्त्र व्यापार विश्वात ज्यावर मागे मोठे आरोप झाले असा अभिषेक वर्मा हा शिंदे गटात गेला आणि तो राष्ट्रीय समन्वयकही झाला. मुळात वर्मावर २००६ साली आज शिंदेंचे छत्र असलेल्या भारतीय जनता पक्षाने त्यावर मोठे आरोप केले होते. या आरोपानंतर वर्माने भाजपचे ज्येष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणी यांच्यावर खटलादेखील भरला होता. मग आज अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे अडवणींवर भरलेला हा खटला विसरले आहेत की अभिषेक वर्मा हा माणूस त्यांच्या स्मरणातून गेला, असा घणाघात अंबादास दानवे यांनी केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे त्यांनी लिहिले आहे की, “विसरले म्हणून की काय भाजपची उपशाखा असलेल्या शिंदे गटात वर्मा सारखे लोक प्रवेश करतात आणि पदही मिळवत आहेत. असे असेल तर लाल कृष्ण अडवाणी यांच्या लढ्याला आज भाजपच्या लेखी शून्य महत्व राहिले आहे!” अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

शस्त्र व्यापार विश्वात ज्यावर मागे मोठे आरोप झाले असा अभिषेक वर्मा हा शिंदे गटात गेला आणि तो राष्ट्रीय समन्वयकही झाला. मुळात वर्मावर २००६ साली आज शिंदेंचे छत्र असलेल्या भारतीय जनता पक्षाने त्यावर मोठे आरोप केले होते. या आरोपानंतर वर्माने भाजपचे ज्येष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणी… — Ambadas Danve (@iambadasdanve) February 12, 2025

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

ठाकरे गटाने याचबरोबर शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या एका कार्यक्रमातील उपस्थितीवर नाराजी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे यांना शरद पवारांनी पगडी देऊन सन्मान केला. त्याचबरोबर शरद पवारांचे त्यांचे कौतुक देखील केले. मात्र ही गोष्ट ठाकरे गटाला आवडलेली नाही. ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसमोर थेट आपली नाराजी व्यक्त केली आहे. संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रातील लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? राजकारणात कोण-कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो, हे ठीक आहे. पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांना अशाप्रकारे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारा आहे. ही आमची भावना आहे, कदाचित पवारांची भावना वेगळी असू शकेल. पण हे महाराष्ट्रातील जनतेला पटलेलं नाही. कारण शरद पवारांचा आम्ही आदर करतो”, असा आक्रमक पवित्रा खासदार संजय राऊतांनी घेतला आहे.

Web Title: Ambadas danve slams bjp for abhishek verma being in shinde group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2025 | 11:46 AM

Topics:  

  • Ambadas Danve
  • BJP
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
3

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली
4

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.