संग्रहित फोटो : नाना पटोले
नागपूर : शिवसेनेचे नेते आणि माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे विमातळावरून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर संपूर्ण तानाजी सावंत यांच्या मुलाला शोधण्यासाठी संपूर्ण पोलिस यंत्रणा कामाला लागली होती. यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निशाणा साधला. ‘एका व्हीआयपीच्या पोरासाठी जी तत्परता पोलिसांनी दाखवली ती संतोष देशमुख प्रकरणात, परभणीच्या प्रकरणात सरकार का दाखवत नाही?’ असा सवाल नाना पटोले यांनी केला.
नाना पटोले यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘हे सरकार सत्तेचा दुरुपयोग सातत्याने करत आहे. हा गुंडाराज सरकारने पोसलेला आहे. त्याला संरक्षण देण्याचे काम मंत्रालयातून आणि डीजी ऑफिसमधून सुरू आहे. वरून आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले जातात. संतोष देशमुख प्रकरण परभणी प्रकरण असो. सत्ता पक्षाच्या आमदारांना पोलिसांना माफ करा असं सांगत आहे. पोलिस प्रशासनाचा दुरुपयोग सरकार करत आहे.
तसेच जो घटनाक्रम आपण पाहिला सुरुवातीला अपहरण झालं तर सांगितलं, एका व्हीआयपीच्या पोरासाठी जी तत्परता पोलिसांनी दाखवली ती संतोष देशमुख प्रकरणात, परभणीच्या प्रकरणात सरकार का दाखवत नाही? हा प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहे.
सोलापूरकर याची जीभ कापली पाहिजे
या सरकारमध्ये डझनभरापेक्षा जास्त मंत्री असून, जे मंत्री आहे जे महापुरुषांचा सातत्याने अपमान करत आहे. सोलापूरकर याची जीभ कापली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वक्तव्य करून महाराष्ट्राची बदनामी करत आहे. महापुरुषाचा अपमान करत आहे. सरकार झोपलेला आहे का? असा अपमान करणाऱ्यांना बक्षीस द्यायचा हे सरकारला अपेक्षित आहे का?
पालकमंत्रिपद हे आता मुख्यमंत्रिपदापेक्षा मोठं झालंय
पालकमंत्रिपद हे आता मुख्यमंत्रिपदापेक्षा मोठं झालेलं आहे. मंत्र्यांना जिल्ह्यातून कशी मलाई लुटता येईल. त्यासाठी हे प्रकार सुरू आहे. हे भयानक आणि लाजिरवाणा आहे, सरकारने बंद करावे ही अपेक्षा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेस संघटनेतील बदल
ही एक सिस्टीम आहे. एका पदातून मुक्त करून दुसऱ्या जबाबदारी द्यावी. कायमस्वरूपी संघटनेत कोणीच व्यक्ती राहत नाही. प्रत्येकाला संधी मिळावी. त्यापेक्षा चांगला काम करणाऱ्यास संधी मिळावी ही अपेक्षा असते. दिल्ली निवडणूक आणि संघटना याचा संबंध नाही. संघटनेत बदल होत असतात.