Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : “निरोप समारंभाच्या फोटोत तुम्ही हवे होता…; अमोल मिटकरींची अजित पवारांसाठी भावूक पोस्ट

विधान परिषदेतील 9 आमदारांचा कार्यकाळ संपला आहे. सभागृहामध्ये या नेत्यांच्या निवृत्तीचा समारंभ पार पडला. यानंतर अमोल मिटकरी यांनी अजित पवारांसाठी भावूक पोस्ट केली.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 25, 2026 | 12:32 PM
Amol Mitkari emotional social media post after Legislative Council Retirement political news

Amol Mitkari emotional social media post after Legislative Council Retirement political news

Follow Us
Follow Us:
  • विधान परिषदेतून 9 सदस्यांची निवृत्ती
  • उद्धव ठाकरेंसह 9 जणांचा कार्यकाळ संपला
  • अमोल मिटकरी यांची सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Amol Mitakari : मुंबई : सध्या राज्याचे अध्यसंकल्पीय अधिवेशन सुरु असून यामध्ये विरोधकांची ताकद संख्येने कमी होणार आहे. विधान परिषदेतील 9 जणांच्या आमदारकीचा कार्यकाळ संपणार आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह 9 जण निवृत्त झाले आहेत. सभागृहामध्ये या नेत्यांच्या निवृत्तीचा समारंभ पार पडला. यानंतर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सोशल मीडियावर भावूक पोस्ट केली आहे.

 

शिवसेना पक्षप्रमुख, आमदार उद्धव ठाकरे यांच्यासह निवृत्त होणाऱ्या 9 आमदारांना विधान परिषदेत निरोप देण्यात आला. यामध्ये विधान परिषदेतील आमदार नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके, आणि रमेश कराड यांचा समावेश असणार आहे. 13 मे रोजी त्यांची आमदारकीची मुदत संपणार आहे. याच पार्श्वभूमीवर रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुकीची लवकरच घोषणा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील वाचा : अंकातून भविष्य मांडणार भोंदूबाबा गणितात फेल; अशोक खरात 10 वी नापास

यावेळी दिवंगत नेते अजित पवारांच्या आठवणीने अनेक नेते भावूक झाले होते. अजित पवारांचे खंदे समर्थक असलेले अमोल मिटकरी यांचा देखील कार्यकाळ संपला आहे. त्यांनी आमदारकीच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांचा फोटो हातामध्ये घेऊन प्रवेश केला. तसेच विधीमंडळाच्या पायऱ्यांवर डोक ठेवलं. याचबरोबर त्यांनी सोशल मीडिया पोस्ट देखील केली आहे.

आदरणीय दादा निरोप समारंभाच्या या फोटोत तुम्ही असायला हवा होता. या निरोप समारंभाच्या शेवटच्या दिवसाची माझी इच्छा तुम्ही कायम अपुर्ण ठेवली.या पवित्र सभागृहाचा निरोप घेत असलो तरी तुमची अचानक सोडून जाण्याची EXIT व त्याचा शोध आपल्या आठवणीत रोज गहिवरणाऱ्या व महाराष्ट्रभर विखुरलेल्या… pic.twitter.com/Ubeaxys4L7 — आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 25, 2026

अमोल मिटकरी यांनी एक्सवर पोस्टमध्ये लिहिले की, “आदरणीय दादा निरोप समारंभाच्या या फोटोत तुम्ही असायला हवा होता. या निरोप समारंभाच्या शेवटच्या दिवसाची माझी इच्छा तुम्ही कायम अपुर्ण ठेवली.या पवित्र सभागृहाचा निरोप घेत असलो तरी तुमची अचानक सोडून जाण्याची EXIT व त्याचा शोध आपल्या आठवणीत रोज गहिवरणाऱ्या व महाराष्ट्रभर विखुरलेल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आपल्या विमान दुर्घटनेचं सत्य समोर आणण्यासाठी शेवटपर्यंत लढा दिला जाईल हा एका शेतकरी लेकाचा शब्द आहे युद्ध आमचे सुरू जिंकु किंवा मरू, असे अमोल मिटकरी यांनी लिहिले आहे.

हे देखील वाचा :  सातारा प्रकरण टाकणार महायुतीत मिठाचा खडा? मध्यरात्री DCM शिंदेंनी गाठले वर्षा निवासस्थान

Web Title: Amol mitkari emotional social media post after legislative council retirement political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 12:32 PM

Topics:  

  • ajit pawar
  • amol mitkari
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

‘…पण महाराष्ट्र सरकार शुभ तारखा तपासण्यात व्यस्त’; दुष्काळ जाहीर करण्यावरून उद्धव ठाकरेंचा टोला
1

‘…पण महाराष्ट्र सरकार शुभ तारखा तपासण्यात व्यस्त’; दुष्काळ जाहीर करण्यावरून उद्धव ठाकरेंचा टोला

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले
2

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले

Shivsena Symbol Supreme Court Hearing: ठाकरे-शिंदे वादाचा अंतिम टप्पा; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
3

Shivsena Symbol Supreme Court Hearing: ठाकरे-शिंदे वादाचा अंतिम टप्पा; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.