Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय अनंता पावशे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

शिवसेना शिंदे गटाने भाजपला धक्का देत कल्याण पूर्वेतील भाजपचे माजी नगरसेवक आणि भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय असलेले अनंता पावशे यांना पक्षात प्रवेश दिला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 15, 2026 | 07:14 AM
भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय अनंता पावशे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय अनंता पावशे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Follow Us
Follow Us:

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात युती असली, तरी या युतीतील अंतर्गत राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना तसेच माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात घेण्याची चढाओढ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कल्याण पूर्वेतील शिवसेना शिंदे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये रविवारी संध्याकाळी प्रवेश केला. त्यानंतर सोमवारी (दि.14) शिवसेना शिंदे गटाने भाजपला धक्का देत कल्याण पूर्वेतील भाजपचे माजी नगरसेवक आणि भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय असलेले अनंता पावशे यांना पक्षात प्रवेश दिला. अनंता पावशे यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशामध्ये शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती आहे.

Maratha Reservation : मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारली; जरांगे पाटील कोर्टात जाण्याच्या तयारीत, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गट, भाजप आणि मनसे यांची युती असली, तरी युतीतीलच पक्षांकडून एकमेकांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी फोडण्याचे सत्र सुरू असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या पळवापळवीमुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकारण दिवसेंदिवस अधिकच तापत असल्याचे दिसून येत आहे.

ठाकरे गटाचे आमदार शिंदे गटात प्रवेश करणार?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल १४ आमदार आगामी नवरात्रीपूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा शिंदेसेनेतील एका बड्या नेत्याने केला आहे. या दाव्यामुळे ठाकरे गटाच्या राजकीय भवितव्याबाबत चर्चांना उधाण आले आहे. सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाकडे विधानसभेतील २० आमदार आहेत. यापैकी १४ आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या १४ आमदारांची नावे अद्याप अधिकृतपणे समोर आलेली नाहीत. त्यामुळे नेमके कोणते आमदार पक्षांतर करणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

West Bengal Politics : पश्चिम बंगालमध्ये खेला होबे! दुर्गापूजेपूर्वी १७ बंडखोर खासदार भाजपमध्ये सामील होणार

Web Title: Ananta pawshe a close associate of bjp mla ganpat gaikwad joins shindes shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 07:08 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Shivsena Politics

संबंधित बातम्या

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका
1

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका

Maharashtra Breaking News Today 2026: वर्षभराच्या लढाईनंतर माधुरी हत्तीण कोल्हापुरात दाखल
2

Maharashtra Breaking News Today 2026: वर्षभराच्या लढाईनंतर माधुरी हत्तीण कोल्हापुरात दाखल

Mantralaya Staff Relieved Decision: मुख्यमंत्री कार्यालयाचा मोठा निर्णय ! ५७० कर्मचाऱ्यांची मूळ विभागात हकालपट्टी
3

Mantralaya Staff Relieved Decision: मुख्यमंत्री कार्यालयाचा मोठा निर्णय ! ५७० कर्मचाऱ्यांची मूळ विभागात हकालपट्टी

Maharashtra Breaking News Today 2026: नवी दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषदेचा बिगुल, बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप
4

Maharashtra Breaking News Today 2026: नवी दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषदेचा बिगुल, बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.