Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आधी आपल्या मुलीला तुतारीतून फोडून दाखवा आणि मग..,’ शरद पवार गट फुटीच्या चर्चेवरून अनिल देशमुखांचा ‘त्या’ आमदारावर निशाणा

धर्मराव बाबा आत्राम यांनी शरद पवार गटातील पाच खासदार फुटू शकतात असा दावा केल्यानंतर अनिल देशमुख यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. 'आधी आपल्या मुलीला तुतारीतून फोडून दाखवा' असे म्हणत त्यांनी आत्रामांच्या विधानाला प्रत्युत्तर दिले.

  • By विवेक
Updated On: Jun 19, 2026 | 03:41 PM
शरद पवार गट फुटीच्या चर्चेवरून अनिल देशमुखांचा धर्मरावबाबा आत्रामांवर निशाणा

शरद पवार गट फुटीच्या चर्चेवरून अनिल देशमुखांचा धर्मरावबाबा आत्रामांवर निशाणा

Follow Us
Follow Us:
  • ठाकरे गटाच्या खासदार फुटीनंतर आता शरद पवार गटाच्या फुटीच्या चर्चा
  • राष्ट्रवादीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा आमदार, खासदार फुटीचा मोठा दावा
  • शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांचा जोरदार पलटवार
 

महाराष्ट्रातील राजकारणात सध्या पक्षफुटी आणि पक्षांतरांच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील खासदारांच्या भूमिकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातही संभाव्य फुटीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी केलेल्या दाव्यावर आमदार अनिल देशमुख यांनी जोरदार पलटवार केला आहे.

काय म्हणाले अनिल देशमुख?

धर्मराव बाबा आत्राम यांनी शरद पवार गटातील काही खासदार आणि आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येऊ शकतात, असा दावा केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना अनिल देशमुख यांनी सोशल मीडियावरून आत्राम यांच्यावर टीकेची झोड उठवली.

पवारांच्या राष्ट्रवादीचे काही खासदार फुटणार असल्याचे तथ्यहीन वक्तव्य डुप्लिकेट #NCP चे नेते बाबा आत्राम यांनी केले आहे. हे वक्तव्य पूर्णतः निराधार आहे. बाबा आत्राम यांची मुलगी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत आहे. आत्राम यांनी आधी आपल्या मुलीला तुतारीतून फोडून दाखवावे आणि मग आमदार… — ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) June 19, 2026

देशमुख म्हणाले, “पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे काही खासदार फुटणार असल्याचे तथ्यहीन वक्तव्य डुप्लिकेट NCP चे नेते बाबा आत्राम यांनी केले आहे. हे विधान पूर्णपणे निराधार आहे. बाबा आत्राम यांची मुलगी आजही पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत आहे. त्यांनी आधी आपल्या मुलीला तुतारीतून फोडून दाखवावे आणि मग आमदार-खासदार फोडण्याच्या बाता माराव्यात.” या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

उद्धव ठाकरेनंतर आता शरद पवार गटाला धक्का? ‘तुतारी’चे पाच खासदार आमच्याकडे येण्यास इच्छुक; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा

धर्मराव बाबा आत्राम यांचा मोठा दावा

माध्यमांशी बोलताना धर्मराव बाबा आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अधिक मजबूत होत असल्याचा दावा केला. पक्षात माजी खासदार आणि आमदार प्रवेश करत असून भविष्यात विद्यमान खासदार-आमदारही पक्षात येऊ शकतात, असे ते म्हणाले.

आत्राम यांनी पुढे दावा केला की, “आम्ही कोणतेही ऑपरेशन करणार नाही. ऑपरेशन तुतारीवालेच करतील. तुतारीचे पाच खासदार आमच्या पक्षात येऊ शकतात. विकासासाठी आणि पुढील निवडणुकांमध्ये टिकून राहण्यासाठी अनेकांना सत्तेसोबत राहण्याची गरज वाटत आहे.” तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास वाढत असल्याचाही दावा त्यांनी केला.

Operation Tiger : फक्त एकनाथ शिंदेच नाहीतर ‘या’ बड्या नेत्यांनीही दिला शिवसेनेला धक्का; सेनेच्या इतिहासातील सहावी मोठी फूट

राष्ट्रवादीतील राजकारण पुन्हा चर्चेत

शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसमधील अलीकडील घडामोडींनंतर महाराष्ट्रातही विविध पक्षांतील संभाव्य फुटीच्या चर्चांना वेग आला आहे. अशा परिस्थितीत धर्मराव बाबा आत्राम आणि अनिल देशमुख यांच्यातील शाब्दिक चकमकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे. पुढील काही महिन्यांत प्रत्यक्षात कोणते राजकीय बदल घडतात, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Anil deshmukh slams dharmarao baba atram over ncp split claim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 03:41 PM

Topics:  

  • anil deshmukh
  • NCP Sharad Pawar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.