Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri Politics : ‘सुनील तटकरे स्वतःच्या बापाचे…’; रामदास कदमांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीनंतर रत्नागिरीच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. त्याचवेळी माजी मंत्री रामदास कदम यांनी जयंत पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केल्याने राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 17, 2026 | 01:00 PM
'सुनील तटकरे स्वतःच्या बापाचे...'; रामदास कदमांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

'सुनील तटकरे स्वतःच्या बापाचे...'; रामदास कदमांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Follow Us
Follow Us:
  • आशिष शेलारांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण
  • रामदास कदमांचे जयंत पाटील यांचे कौतुक
  • तटकरेंवर जहरी टीका
Maharashtra Politics : राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी नुकतीच आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीनंतर रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे. ही केवळ औपचारिक सदिच्छा भेट होती की आगामी काळातील नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क रंगू लागले आहेत.

या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वातावरण अधिकच तापले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार जयंत पाटील यांच्या अलीकडील भेटीबाबत विचारण्यात आले असता, कदम यांनी जयंत पाटील यांच्या कार्याचे खुलेपणाने कौतुक केले. विरोधी पक्षातील नेत्याबाबत केलेल्या या सकारात्मक वक्तव्यामुळे विविध राजकीय चर्चांना आणखी चालना मिळाली आहे.

दिल्लीतील उपोषणाची धग आता मुंबईत! सोनम वांगचुक यांच्यासाठी आदित्य ठाकरे रस्त्यावर; ९ जुलैला शिवतीर्थावर जमण्याचे जाहीर आवाहन

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना रामदास कदम यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. “सुनील तटकरे स्वतःच्या बापाचे होऊ शकत नाहीत,” असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एका बाजूला आशिष शेलार यांची भास्कर जाधव यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट, दुसऱ्या बाजूला जयंत पाटील यांच्याबाबत रामदास कदम यांनी व्यक्त केलेले कौतुक आणि तिसऱ्या बाजूला सुनील तटकरे यांच्यावर केलेली जहरी टीका, या सर्व घडामोडींमुळे रत्नागिरीसह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आगामी काळात या भेटी आणि वक्तव्यांमुळे कोणती नवी राजकीय समीकरणे आकार घेतात, तसेच त्याचे राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान या भेटीनंतर कोकणाच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले असून मंत्री आशिष शेलारांच्या भास्कर जाधवांच्या कार्यालय भेटी मागे राजकीय संदेश काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. तर या भेटीमुळे आगामी काळात राजकीय समीकरणे बदलणार अशा नव्या चर्चाही कोकणात रंगल्या असून यावर भास्कर जाधव कोणते स्पष्टीकरण देतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

शिंदे गटात गेलेले सचिन अहिर सरकारी बंगल्यावरून नाराज? एकनाथ शिंदेंकडे व्यक्त केली थेट नाराजी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Web Title: Ashish shelar bhaskar jadhav meeting ramdas kadam on jayant patil sunil tatkare political reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • Bhaskar Jadhav
  • Ramdas Kadam

संबंधित बातम्या

‘वारसाहक्काने पैसा मिळतो, पक्ष मिळत नाही’, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना टोला
1

‘वारसाहक्काने पैसा मिळतो, पक्ष मिळत नाही’, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.