Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘खोट्या कागदपत्रांवर जात वैधता प्रमाणपत्र सहन करणार नाही,’ बबनराव तायवाडेंचा जरांगेंना पलटवार

मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले असताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी 58 लाख कुणबी नोंदींबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. जरांगे यांच्या आंदोलनानंतर 15 हजार 597 जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

  • By विवेक
Updated On: Aug 12, 2026 | 03:07 PM
Babanrao Taywade

Babanrao Taywade

Follow Us
Follow Us:
  • शिंदे समितीने 58 लाख 90 हजार 155 कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी नोंदी शोधल्याचा दावा
  • यातील 37 लाख 47 हजार 142 नोंदी 1986 ते 2023 या कालावधीतील जुन्या असल्याचे तायवाडे म्हणाले.
  • खोट्या कागदपत्रांच्या आधारे जात वैधता प्रमाणपत्र देण्यास विरोध करणार असल्याची भूमिका.
 

राज्यात मराठा आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून कुणबी-मराठा बांधवांच्या जात प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांकडूनही जरांगे यांच्या भूमिकेला प्रत्युत्तर दिले जात आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी कुणबी नोंदींबाबत महत्त्वाची आकडेवारी मांडत जरांगे पाटील यांच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

‘58 लाख नोंदींपैकी 37 लाख नोंदी जुन्या’

तायवाडे यांच्या म्हणण्यानुसार, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मराठा समाजातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीची स्थापना केली होती. या समितीने राज्यभरात कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी अशा एकूण 58 लाख 90 हजार 155 नोंदी शोधल्या आहेत.

Maharashtra Politics: ‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्यासाठी राऊतांनी कुभांड रचले’, नरेश म्हस्केंचा गंभीर आरोप

मात्र, या एकूण नोंदींपैकी 37 लाख 47 हजार 142 नोंदी या 1986 ते 2023 या कालावधीतील जुन्या नोंदी आहेत. या नोंदींच्या आधारे संबंधितांना यापूर्वीच ओबीसी प्रवर्गातील जात प्रमाणपत्र मिळाले असल्याचा दावा तायवाडे यांनी केला. त्यामुळे या जुन्या नोंदींचा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाशी थेट संबंध जोडणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जरांगेंच्या आंदोलनानंतर किती जणांना प्रमाणपत्र?

मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर मराठवाड्यात न्यायमूर्ती शिंदे समितीला 49 हजार 358 नोंदी आढळल्याचे तायवाडे यांनी सांगितले. त्यापैकी 20 हजार 143 जणांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला. तर 15 हजार 597 जणांना कुणबी म्हणून ओबीसी जात प्रमाणपत्र मिळाले, अशी माहिती त्यांनी दिली. हेच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचे यश असल्याचे तायवाडे यांनी म्हटले.

दरम्यान, समितीच्या कामानंतर राज्यात 3 लाख 11 हजार 287 जणांना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा म्हणून जात प्रमाणपत्र देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यापैकी 2 लाख 91 हजार 144 जणांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज का केला नाही, असा सवालही राष्ट्रीय ओबीसी महासंघाने उपस्थित केला आहे.

‘खोट्या कागदपत्रांवर प्रमाणपत्र सहन करणार नाही’

ज्यांच्याकडे कुणबी नोंदीशी संबंधित वैध कागदपत्रे आहेत, त्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, हीच राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका असल्याचे तायवाडे यांनी स्पष्ट केले.

‘कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही,’ मनोज जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर

ओबीसी प्रमाणपत्र मिळालेल्या व्यक्तींचे स्वागत आहे, मात्र बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

त्यामुळे मराठा आरक्षण, कुणबी नोंदी आणि जात वैधता प्रमाणपत्राचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. आगामी काळात जरांगे पाटील आणि ओबीसी संघटनांमध्ये या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Web Title: Babanrao taywade 58 lakh kunbi records manoj jarange patil maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • Dr. Babanrao Taiwade
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

‘मराठ्यांना फसवाल तर भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
1

‘मराठ्यांना फसवाल तर भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

मराठा आरक्षणावरून जरांगे पुन्हा आक्रमक; ‘सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न करेल’, भास्कर जाधवांचा गंभीर आरोप
2

मराठा आरक्षणावरून जरांगे पुन्हा आक्रमक; ‘सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न करेल’, भास्कर जाधवांचा गंभीर आरोप

‘जो गद्दारी करेल तो मराठा जातीचा नाही’; आटपाडीच्या सभेत मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
3

‘जो गद्दारी करेल तो मराठा जातीचा नाही’; आटपाडीच्या सभेत मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

Maratha Reservation Breaking Update: मराठा आरक्षण सुनावणी पुन्हा रखडणार? न्यायमूर्ती घुगेंच्या पदोन्नतीमुळे पेच वाढणार
4

Maratha Reservation Breaking Update: मराठा आरक्षण सुनावणी पुन्हा रखडणार? न्यायमूर्ती घुगेंच्या पदोन्नतीमुळे पेच वाढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.