Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Politics: मोठी बातमी! शरद पवारांनी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक

मतदानाच्या दिवशीच रोहित पवार आणि जय पवार यांनी काही विधाने केली होती. 2029 मध्ये होणारी बारामती विधानसभा निवडणूक युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार अशी होऊ शकते, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 28, 2026 | 01:22 PM
Maharashtra Political Crisis 2026, Jayant Patil Vinod Tawde Meeting, Sharad Pawar

Maharashtra Political Crisis 2026, Jayant Patil Vinod Tawde Meeting, Sharad Pawar

Follow Us
Follow Us:
  • बारामतीत राजकीय खलबंत
  • शरद पवारांनी बोलवली पवार कुटुबाची बैठक
  • राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
 

Baramati Politics: बारामतीच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांनी पवार कुटुंबाची एक तातडीची बैठक बोलावली आहे. पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी पवार कुटुंबाची ही तातडीची बैठक होणार असल्याची माहिती आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवारांनी ही बैठक बोलावल्याने चर्चांना उधाण आले आहे.

या बैठकीमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पण आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार , सुप्रिया सुळे, रोहित पवार, राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार, पार्थ पवार उपस्थित राहतील, असे सांगितले जात आहे. 23 एप्रिलला बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली.  मतदानाच्या दिवशीच रोहित पवार आणि जय पवार यांनी काही विधाने केली होती. 2029 मध्ये होणारी बारामती विधानसभा निवडणूक युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार अशी होऊ शकते, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

बारामतीत मतदान घटले, बालेकिल्ल्यात गटबाजीचा फटका, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आत्मचिंतनाची गरज

आगामी 2029 च्या विधानसभा निवडणुकीत आपण बारामती विधानसभा मतदारसंघातून संभाव्य उमेदवार असू शकतो, असे संकेत जय पवार यांनी दिले होते. जय पवार यांच्या विधानावर आमदार रोहित पवार यांनी, शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार उमेदवार असतील, असे संकेत दिले. दोघांच्याही या वक्तव्यानंतर बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊ शकते, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. या विषयावर शरद पवार आज काही भूमिका घेणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यासंदर्भात आज त्यांनी ही बैठक बोलवली असण्याची शक्यता आहे.

Baramati Assembly bypoll Elections 2026: बारामतीत ३५ वर्षांनंतर पुन्हा पोटनिवडणूक! १९९१ मध्ये अजित पवारांनी रचला होता इतिहास

दरम्यान, या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत चर्चा होऊ शकते, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

या बैठकीला रोहित पवार, पार्थ पवार आणि युगेंद्र पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच राजेंद्र पवार आणि श्रीनिवास पवार हेही बैठकीत सहभागी होऊ शकतात. श्रीनिवास पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू आहेत. तर राजेंद्र पवार हे त्यांचे चुलत बंधू आहेत. कौटुंबिक तसेच राजकीय अशा दोन्ही स्तरांवरील विषयांवर या बैठकीत चर्चा होऊ शकते. बैठकीनंतर पवार कुटुंबातील एखादा सदस्य माध्यमांसमोर येऊन अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मतदानाच्या दिवशी श्रीनिवास पवार यांना भाजपकडून पवार कुटुंबात राजकारण घुसवले जात आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देताना, “भाजपला बदनाम करण्यात काय उपयोग? तुम्हाला स्वतःलाच काय चाललं आहे ते समजत नाही. पवार कुटुंब हे राजकारणातलं जुने कुटुंब आहे, हे समजून घेतलं पाहिजे,” असे स्पष्ट उत्तर दिले.

Web Title: Baramati politics big news sharad pawar calls an urgent meeting of the pawar family

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 12:33 PM

Topics:  

  • Baramati Politics
  • Maharashtra Politics
  • Sharad Pawar
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 
1

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका
2

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका

Maharashtra Breaking News Live Updates Today:  ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच
3

Maharashtra Breaking News Live Updates Today: ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच

Mira Bhayandar News: उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर
4

Mira Bhayandar News: उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.