Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut News: ‘मी याआधी ५ लोकांना ठार केलंय’; संजय राऊतांचा आरोप कुणावर, थेट पोलीस आयुक्तांना लिहीले पत्र

खासदाराकडून बॉम्ब टाकण्याची धमकी चिंताजनक आहे. हे बॉम्ब त्यांनी आपल्या घरात बनवले असतील तर त्यांच्या घराची त्वरित झडती घ्यावी. त्याकामी दहशतवादविरोधी पथकाची मदत घ्यावी. हे बॉम्ब त्यांना कुणा दहशतवादी टोळीकडून मिळाले असतील तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर मुद्दा मानावा लागेल

  • By anuradha sagar
Updated On: Jun 25, 2026 | 12:23 PM
Pradeep Purnekar Murder, Sanjay Raut Press Conference

Pradeep Purnekar Murder, Sanjay Raut Press Conference

Follow Us
Follow Us:
  • संजय राऊत यांचे मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून ईशान्य मुंबईतील शिंदे गटाचे खासदार संजय पाटील यांच्यावर गंभीर आरोप
  • शांततेत आंदोलन करणाऱ्या नागरिकांना आणि शिवसैनिकांना खासदार संजय पाटील यांनी जीवे मारण्याची धमकी
  • “माझ्याविरोधात कोणी आंदोलन केले तर त्यांच्यावर बॉम्ब टाकेन आणि घरात घुसून मारेन-संजय पाटील
Sanjay Raut letter to Mumbai Police Commissioner : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलिस आयुत्त देवेन भारती यांना एक खळबळजनक पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटातून फुटलेल्या सहा आमदारांपैकी एक असलेले संजय पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे संजय पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा मला न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशाराही राऊत यांनी दिला आहे.

‘…हे राहुल नार्वेकर आहेत की युरोपमधील ‘नॉर्वेकर’; मराठीच्या मुद्यावरून संजय राऊतांचा टोला

काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी देवेन भारती यांना लिहीलेल्या पत्रात ?

जय महाराष्ट्र !

एका गंभीर बाबीकडे मी आपले लक्ष वेधत आहे. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ) पक्षातून फुटलेले सहा खासदार देशभरात घृणेचा विषय ठरले आहेत. या फुटीविरुद्ध महाराष्ट्राच्या जनतेत कमालीचा संताप असून मतदारांची घोर फसवणूक झाल्यामुळे लोक ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. आंदोलन करणे , लोकप्रतिनिधीस जाब विचारणे हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे. पण ईशान्य मुंबईतील ‘फुटीर’ खासदार संजय पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे . श्री. पाटील म्हणतात,” माझ्या नादाला लागू नका. माझ्याविरोधात आंदोलन करण्याआधी जिवाचा विमा काढून घ्या. मी सरळ तुम्हाला स्मशानात पाठवीन. नाहीतर हॉस्पिटलात पाठवीन.

धमकी देताना ते पुढे म्हणतात,

“मी याआधी ५ लोकांना ठार केले आहे .(ठार केलेले हे ५ लोक कोण व संजय पाटील यांनी त्यांना कधी व का ठार केले त्याचा तपास व्हावा. आरोपीने स्वतःच कबुली दिल्याने त्यांच्याविरोधात् तत्काळ हत्येचा गुन्हा दाखल व्हावा.)

शिर्डीत शिवसैनिकांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप; संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप

“माझ्याविरोधात कोणी आंदोलन केले तर त्यांच्यावर बॉम्ब टाकेन.घरात घुसून मारेन.”

मा. भारतीजी, खासदाराकडून बॉम्ब टाकण्याची धमकी चिंताजनक आहे. हे बॉम्ब त्यांनी आपल्या घरात बनवले असतील तर त्यांच्या घराची त्वरित झडती घ्यावी. त्याकामी दहशतवादविरोधी पथकाची मदत घ्यावी. हे बॉम्ब त्यांना कुणा दहशतवादी टोळीकडून मिळाले असतील तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर मुद्दा मानावा लागेल व दहशतवादी, राष्ट्रविरोधी कृत्यांत सहभागी झाल्याबद्दल त्यांना लगेच UAPA खाली अटक होणे गरजेचे आहे.

त्यांची सर्व वक्तव्ये दहशतवाद, गुन्हेगारी कृत्यात सहभागी होण्याचे पुरावे आहेत. त्यांच्या विरोधात त्वरित कारवाई व्हावी , अन्यथा मला जनतेच्या सुरक्षेसाठी न्यायालयात दाद मागावी लागेल . खा . पाटील यांच्या धमकीमुळे समाजात चिंतेचे वातावरण आहे. या काळात एखाद्या राजकीय कार्यकर्त्यांवर हल्ला झाला अथवा खून झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संजय पाटील यांच्यावर राहील, हे मी इथे खास नमूद करतो कळावे.

 

Shri ⁦@DevenBhartiIPS⁩ ji
विषय गंभीर आहे! pic.twitter.com/4C3KgQeB6W
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 25, 2026

Web Title: Sanjay raut letter mumbai police commissioner deven bharti mp sanjay patil threat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 12:22 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • sanjay patil
  • sanjay raut
  • shivsena

संबंधित बातम्या

तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात, सुटकेसाठी आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत जोरदार आंदोलन
1

तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात, सुटकेसाठी आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत जोरदार आंदोलन

Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकर शिंदेंची साथ सोडणार अन ठाकरे गटात जाणार? कीर्तिकारांनी अखेर मौन सोडलं
2

Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकर शिंदेंची साथ सोडणार अन ठाकरे गटात जाणार? कीर्तिकारांनी अखेर मौन सोडलं

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?
3

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट
4

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.