• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • More Than 5000 Women Farmers Will Receive Training In Sustainable Farming

महिला शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५ हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे प्रशिक्षण मिळणार

करारांतर्गत नऊ जिल्ह्यांतील पाच हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे प्रशिक्षण मिळणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 03, 2026 | 06:18 PM
५ हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे प्रशिक्षण मिळणार

५ हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे प्रशिक्षण मिळणार

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी
  • गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्वपूर्ण
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई : “महाराष्ट्रातील शेतकरी हे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. शेतीवर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांमध्ये महिलांची भूमिका निर्णायक आहे. गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या राज्य शासनाच्या कटिबद्धतेचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्यातील महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम–उमेद) यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे राज्यातील नऊ कापूस उत्पादक जिल्ह्यांतील पाच हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत व आधुनिक शेती पद्धतींचे प्रशिक्षण मिळणार आहे.

ST Bus News : सवलतीच्या दरात सुरक्षित देवदर्शन योजना! बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त उपक्रमाचे आयोजन

महिला शेतकरी सक्षमीकरणाच्या दिशेने महत्वाचे पाऊल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्रातील शेतकरी हे आपल्या राज्याचा कणा आहेत. हजारो कुटुंबांची उपजीविका शेतीवर अवलंबून असून, त्यातील अनेक कुटुंबांचे नेतृत्व कर्तृत्ववान महिला करत आहेत. अशा शेतकऱ्यांना सुलभ कर्ज आणि आवश्यक मदत वेळेवर मिळावी यासाठी शासन कटिबद्ध आहे. या पार्श्वभूमीवर गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतची भागीदारी ही शाश्वत कृषी पद्धती आणि लैंगिक समावेशनाबाबत आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक शेती पद्धतींच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विशेषतः महिला शेतकरी आत्मनिर्भर बनून राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देतील, यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल, महिला शेतकऱ्यांना वैज्ञानिक शेती पद्धती, बाजारपेठेतील संधी आणि माहितीपूर्ण निर्णयक्षमतेस सक्षम करून, हा उपक्रम महाराष्ट्रातील शेती उत्पादनक्षमता, उपजीविका आणि ग्रामीण टिकाऊपणा यामध्ये दीर्घकालीन सुधारणा साधण्याचा यशस्वी प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

उपक्रमाची व्याप्ती आणि उपयुक्तता

संयुक्त राष्ट्रांनी २०२६ हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर हा तीन वर्षांचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील नऊ कापूस उत्पादक जिल्ह्यांतील ५ हजारहून अधिक महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेट आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या अंतर्गत महिला शेतकऱ्यांना चांगल्या कृषी पद्धती (जीएपी) आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन (आयपीएम) याबाबत प्रशिक्षण देण्यात येईल, ज्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. राज्य शासन महिला शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक मार्गदर्शन आणि बाजारपेठेशी जोडण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. महिला शेतकरी वर्गाला सक्षमकरण्याच्या दिशेने हे निश्चितच एक महत्वपूर्ण पाऊल आहे.

ही तीन वर्षांची भागीदारी स्वयं-सहायता गट (एसएचजीएस) आणि महिला शेतकऱ्यांना चांगल्या कृषी पद्धती (जीएपी) आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन (आयपीएम) स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करेल, ज्यामुळे शेती उत्पादनक्षमता वाढून शाश्वत व सक्षम उपजीविका निर्माण होणार आहे.

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात नागपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, परभणी, जळगाव, बीड, अकोला आणि नांदेड या नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे. ५० हजार एकर क्षेत्रावर पाच हजारांहून अधिक महिला शेतकरी आणि १०० स्वयंसहायता गट या उपक्रमाचा लाभ घेणार आहेत. पुढील तीन वर्षांत हा उपक्रम ५०० हून अधिक स्वयंसहायता गटांपर्यंत विस्तारण्यात येणार आहे. तसेच कापसाबरोबरच मका व इतर पिक उत्पादक शेतकऱ्यांपर्यंतही हा उपक्रम पोहोचवण्याचा मानस आहे.

या कराराअंतर्गत एमएसआरएलएम–उमेदकडून स्वयंसहायता गट व कृषी सखी नेटवर्कद्वारे महिला शेतकऱ्यांचे संघटन व समन्वय साधला जाणार आहे. तर गोदरेज ॲग्रोव्हेटकडून प्रशिक्षण कार्यशाळा, प्रात्यक्षिक शेतजमिनी, शेतकरी क्षेत्रशाळा व सुरक्षितता किट्स पुरवण्यात येणार आहेत. या सामंजस्य कराराअंतर्गत, गोदरेज ॲग्रोवेट आणि एमएसआरएलएम उमेद संयुक्तपणे जीएपी, आपीएम आणि सुरक्षितता पद्धतींवरील प्रशिक्षण कार्यशाळा, शेतकरी क्षेत्रीय शाळा (Farmer Fie ld Schools), प्रात्यक्षिक प्लॉट्स आणि सुरक्षितता किट्सचे वितरण करणार आहेत.

Thane News : ठाण्यातील १८ मजली इमारतीला भीषण आग, दोन जण जखमी तर ७० जणांना वाचवण्यात यश

Web Title: More than 5000 women farmers will receive training in sustainable farming

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • farmer
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : पायाभूत सुविधांसाठी आवश्यक भूसंपादन गतीने पूर्ण करावे, देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट निर्देश
1

Devendra Fadnavis : पायाभूत सुविधांसाठी आवश्यक भूसंपादन गतीने पूर्ण करावे, देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट निर्देश

Thane News : ठाण्यातील १८ मजली इमारतीला भीषण आग, दोन जण जखमी तर ७० जणांना वाचवण्यात यश
2

Thane News : ठाण्यातील १८ मजली इमारतीला भीषण आग, दोन जण जखमी तर ७० जणांना वाचवण्यात यश

ZP Election 2026 : 7 फेब्रुवारीला उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर
3

ZP Election 2026 : 7 फेब्रुवारीला उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग
4

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Konkan Railway AI Health Screening: कोकण रेल्वेवर ‘एआय’चा धमाका! मडगाव स्टेशनवर प्रवाशांची हायटेक आरोग्य तपासणी यशस्वी

Konkan Railway AI Health Screening: कोकण रेल्वेवर ‘एआय’चा धमाका! मडगाव स्टेशनवर प्रवाशांची हायटेक आरोग्य तपासणी यशस्वी

Feb 03, 2026 | 08:11 PM
Navi Mumbai : हायवे की मृत्यूचा सापळा ? पामबीच मार्गावर दुचाकी स्वाराचा अपघातात मृत्यू

Navi Mumbai : हायवे की मृत्यूचा सापळा ? पामबीच मार्गावर दुचाकी स्वाराचा अपघातात मृत्यू

Feb 03, 2026 | 07:58 PM
गेमर्ससाठी आनंदाची बातमी! गेमिंगमुळे आता LinkedIn प्रोफाइल Pro दिसणार; BGMI चा नवीन करिअर मोड ऑन

गेमर्ससाठी आनंदाची बातमी! गेमिंगमुळे आता LinkedIn प्रोफाइल Pro दिसणार; BGMI चा नवीन करिअर मोड ऑन

Feb 03, 2026 | 07:57 PM
Maharashtrachi Hasyajatra Gaurav More: महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडून का गेला होता गौरव? मुलाखतीत केले स्पष्ट

Maharashtrachi Hasyajatra Gaurav More: महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडून का गेला होता गौरव? मुलाखतीत केले स्पष्ट

Feb 03, 2026 | 07:56 PM
IND vs SA: टी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची साऊथ आफ्रिकेविरुद्ध रंगीत तालीम! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाल लाईव्ह सामना?

IND vs SA: टी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची साऊथ आफ्रिकेविरुद्ध रंगीत तालीम! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाल लाईव्ह सामना?

Feb 03, 2026 | 07:52 PM
”लग्नाला १४ वर्षे पूर्ण, हा वनवास कधीच…”, रितेशने दिल्या हटके शुभेच्छा, जिनिलीयाने शेअर केले खास फोटो

”लग्नाला १४ वर्षे पूर्ण, हा वनवास कधीच…”, रितेशने दिल्या हटके शुभेच्छा, जिनिलीयाने शेअर केले खास फोटो

Feb 03, 2026 | 07:39 PM
“नरेंद्र मोदी यांनी देशातील…”; Mangal Prabhat Lodha यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे उदघाटन

“नरेंद्र मोदी यांनी देशातील…”; Mangal Prabhat Lodha यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे उदघाटन

Feb 03, 2026 | 07:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Feb 03, 2026 | 03:15 PM
Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Feb 03, 2026 | 03:09 PM
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Feb 02, 2026 | 06:26 PM
Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Feb 02, 2026 | 06:14 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.