Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्री शिंदेंचं शिक्षण किती? त्यांनी जेवढे अधिकार तेवढंच…’भाजप बड्या नेत्याची गंभीर टीका

राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी महायुती एकत्रित तयारी करत आहे. मात्र भाजप पक्षातील काही नेत्यांची शिंदे गटाचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत नाराजी असल्याचे स्पष्ट होत आहे. आरक्षणाच्या मुद्यावर माजी मंत्री असलेल्या भाजप नेत्याने जहरी टीका केली असून थेट मुख्यमंत्र्यांची शिक्षण काढले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 28, 2024 | 11:01 AM
'उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब कोणी ठेवला?'; एकनाथ शिंदे यांनी थेट नावच सांगून टाकलं

'उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब कोणी ठेवला?'; एकनाथ शिंदे यांनी थेट नावच सांगून टाकलं

Follow Us
Follow Us:

नंदुरबार : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. मात्र त्यापूर्वी राज्यात आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील तर ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके आक्रमक भूमिका घेत आहेत. त्याचबरोबर धनगर आरक्षणाचा मुद्दा देखील चर्चेमध्ये आला आहे. यावरुन आता सत्ताधारी महायुतीमध्ये मतभेद आणि संघर्ष व्हायला सुरुवात झाली आहे. आरक्षणाच्या मुद्दायवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजप नेत्यानेच टीका केली आहे. मुख्यमंत्री शिंदेंचे शिक्षण काढत मुख्यमंत्री शिंदेंना घरचा आहेर दिला आहे.

आरक्षणाचा मुद्दा चर्चेमध्ये असताना मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. तेच आरक्षण देतील अशी जरांगे पाटील यांची भूमिका आहे. मात्र त्यांनी भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अविश्वास दाखवत जोरदार टीका केली आहे. आता भाजप नेत्याने धनगर आरक्षणावरुन मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याचा शब्द मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे. यावर भाजप नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी हे आक्रमक झाले आहेत.

हे देखील वाचा : भाजप-शिंदेंची डोकेदुखी वाढणार; अजित पवारांची मु्ख्यमंत्री पदावरून अमित शाहांकडे मोठी मागणी

पद्माकर वळवी म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकार जितके आहेत तेवढेच त्यांनी वापरावेत. शिंदे समिती ही घटनाबाह्य तयार केलेली समिती आहे. शिंदे समितीला घटनात्मक कुठलाही अधिकार नाही. धनगर समाजाला शॉर्टकट आरक्षण देण्याच्या प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेला निकालानंतर देखील मुख्यमंत्री धनगर समाजाला जीआर कसा देऊ शकतात? जीआर देणे ही अतिशय गंभीर बाब आहे. येणाऱ्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन दिले जात आहे. आदिवासी आमदार, खासदारांनी राजीनामा देण्याची गरज नाही. सरकारमध्ये राहून सरकारसोबत भांडण केले पाहिजे,” असा बंडखोर पवित्रा भाजप नेते पद्माकर वळवी यांनी घेतला आहे.

भाजप नेते पद्माकर वळवी यांनी लोकसभा निवडणूकीच्या पूर्वी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी पद्माकर वळवी यांची शिंदेंवर टीका करताना जीभ घसरली होती. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख केला करत शिंदे हे बेरड, मूर्ख आणि नालायक मुख्यमंत्री असल्याचे पद्माकर वळवी यांनी म्हटले होते. भाजपमधील पद्माकर वळवी यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. त्यामुळे शिंदे गटातील नेते आक्रमक झाले असून भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांना समज द्यावी अशी मागणी केली आहे.

Web Title: Bjp leader padmakar valvi target cm eknath shinde for dhangar reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2024 | 11:01 AM

Topics:  

  • BJP
  • Cm Eknath Shinde
  • shivsena
  • Vidhansabha Election 2024

संबंधित बातम्या

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
1

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
2

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
3

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
4

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.