Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : मी मरावं म्हणून काहीजण…; मतदानापूर्वी भाजप आमदाराचा धक्कादायक दावा

अकोला जिल्ह्यातील राजकारण सध्या भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 30, 2025 | 01:53 PM
BJP MLA Prakash Bharasakale claims he tried to kill him during Corona treatment

BJP MLA Prakash Bharasakale claims he tried to kill him during Corona treatment

Follow Us
Close
Follow Us:
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी जोरदार प्रचार
  • आमदार प्रकाश भारसाकळे यांनी कोरोना काळातील आठवणी सांगितल्या
  • यावेळी त्यांना उपचारामध्ये मुद्दाम दिरंगाई केल्याचा आरोप
Maharashtra Politics : अकोला : राज्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Elections) निवडणूका येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे प्रचाराचा धुराळा उडाला आहे. राजकीय नेत्यांनी तुफान भाषणांनी राजकारणात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. यामध्ये आता अकोला जिल्ह्यातील राजकारण सध्या भाजपचे (BJP) आमदार प्रकाश भारसाकळे यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले.

कोरोना काळात उपचारांमध्ये दिरंगाई करत मारण्याचा डाव असल्याचा धक्कादायक दावा आमदार प्रकाश भारसाकळे यांनी केल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. अकोल्यात झालेल्या उपचारांमध्ये घातपाताचा संशय भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांनी व्यक्त केला आहे. काही राजकीय आणि पक्षांतर्गत विरोधकांनी आपण मरावे यासाठी वाट पाहिली होती, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. अकोट येथील एका जाहीर प्रचारसभेत बोलताना भारसाकळे यांनी हा गौप्यस्फोट केला. त्यामुळे अकोल्यामध्ये राजकीय वाद निर्माण झाला आहे.

महायुतीमध्ये 2 नंबर कोण? रवींद्र चव्हाण म्हणाले “त्याला काहीच किंमत नाही”; शिंदेंना लगावला टोला?

भाषणामध्ये आमदार प्रकाश भारसाकळे यांनी कोरोना काळातील आठवणी सांगितल्या. यावेळी या गंभीर परिस्थितीतून बाहेर पडावे यासाठी काही लोकांनी, विशेषतः राजकीय आणि पक्षांतर्गत विरोधकांनी आपण मरावे अशी इच्छा बाळगली होती. परंतु, केवळ जनतेच्या आशीर्वादाच्या बळावरच आपण या संकटातून सुखरूप बाहेर पडू शकलो, असे सांगत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्याचबरोबर अनेकांनी डाव करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.

आमदार प्रकाश भारसाकळे म्हणाले की, पत्नी सातत्याने मला अकोल्यात योग्य उपचार होत नाहीत. त्यामुळे आपण तातडीने नागपूरला शिफ्ट व्हावे असा सल्ला देत होती. मात्र, येथील जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत असल्याने मी येथेच उपचार घेतले आणि बरा झालो, असा दावा भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांनी केला आहे.

नगरपरिषद-नगरपंचायती निवडणुकीच्या प्रचाराला उरला फक्त एकच दिवस; रविवार ठरणार ‘सुपर संडे’

प्रचाराचा सुपर संडे

यंदा निवडणूक आयोगाने कमी दिवस मिळाल्याने प्रचारात एक दिवसाची मुदतवाढ दिल्याने प्रत्यक्ष मतदानाचा एक दिवसाआधीपर्यंत प्रचार करता येईल. मात्र, सर्वाधिक लक्ष रविवार या सुटीचा दिवशी असून, खऱ्या अर्थात सर्वच उमेदवारांसाठी तो ‘सुपर संडे’ असणार आहे. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने सबंध जिल्ह्यात प्रचाराचा अक्षरक्षः धूमधडाका असेल. सर्वत्र सकाळपासूनच सभा, रॅली, कॉर्नर बैठकांची गदीं असेल. जिल्ह्यातील एकूण २७ ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून प्रचाराची धूम सुरू आहे. ५४६ नगरसेवकांना या सर्व नगरपंचायत व नगरपालिकांमधून निवडून द्यायचे आहेत.

 

Web Title: Bjp mla prakash bharasakale claims he tried to kill him during corona treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 01:52 PM

Topics:  

  • BJP Politics
  • Maharashtra Local Body Election
  • political news

संबंधित बातम्या

PMC Election 2026: एकच नाव, दोन यादीत! दुहेरी मतदान टाळण्यासाठी…; पुण्यातला नेमका घोळ काय?
1

PMC Election 2026: एकच नाव, दोन यादीत! दुहेरी मतदान टाळण्यासाठी…; पुण्यातला नेमका घोळ काय?

Thane Election :  निवडणूक यंत्रणेवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला
2

Thane Election : निवडणूक यंत्रणेवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला

PMC Election 2026: ‘लोकशाही’च्या बळकटीसाठी पुणेकरांची मतदान केंद्रावर गर्दी; पण पार्किंगपाशी अडलं घोडं…
3

PMC Election 2026: ‘लोकशाही’च्या बळकटीसाठी पुणेकरांची मतदान केंद्रावर गर्दी; पण पार्किंगपाशी अडलं घोडं…

BMC Election 2026 : “मतदानासाठी वापरण्यात आलेली शाई पुसली जाते…”, निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं…
4

BMC Election 2026 : “मतदानासाठी वापरण्यात आलेली शाई पुसली जाते…”, निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.