Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“शिवसेनेचा बाप मीच कारण…: भाजप नेते परिणय फुके यांचे वक्तव्य चर्चेत, महायुतीमध्ये पसरणार नाराजी?

Parinay phuke on shivsena :सध्या महायुतीचे नेते हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. भाजप नेते परिणय फुके यांनी शिवसेनेबद्दल वक्तव्य केले आहे. त्यामुळे शिवसेैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 04, 2025 | 03:32 PM
Bjp Parinay phuke on shivsena Controversial statement Maharashtra political news

Bjp Parinay phuke on shivsena Controversial statement Maharashtra political news

Follow Us
Follow Us:

Parinay phuke on shivsena : भंडारा : भंडारामधील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये भाजप नेते परिणय फुके यांनी भाषण केले. यावेळी मात्र त्यांनी केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. शिवसेनेचा बाप मीच असे भाजप नेते परिणय फुके म्हणाले आहेत. यामुळे महायुतीमध्ये मीठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.भाजप नेत्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

काय म्हणाले परिणय फुके?

भंडाऱ्यामधील मेळाव्यामध्ये परिणय फुके म्हणाले की, “काही लोकांनी माझ्यावर आरोप केले. पण मी माझ्यावर काही आरोप झाले त्यावर शांत बसलो. तुमच्या घरी जर काही चांगलं झालं तर कुणी केले? समजा पोरगा दहावीत पास झाला तर पोराने चांगलं केलं, आईने चांगलं केलं असं म्हणतात. काही खराब गोष्ट घडली तर म्हणतात हे बापाने केलं. त्या दिवशी मला हे पक्कं माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे. कारण ते खापर माझ्यावरच फोडत आहेत. या सगळ्या आरोपांकडे लक्ष न देता आपण आपलं काम ताकदीने सुरु ठेवलं पाहिजे आणि पक्ष वाढवण्याचं काम केले पाहिजे, असे भाजप नेते परिणय फुके म्हणाले आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे ते म्हणाले की, लोकं आपला विरोध करत असतील तर आपण ते सगळ्यांपुढे सांगतो. आज मी इथे मान्य करतो आणि आभारही मानतो की मला विधान परिषदेवर नेण्याचं काम हे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.” असं परिणय फुके म्हणाले आहेत. मात्र भाषणावेळी मीच शिवसेनेचा बाप आहे असा म्हटल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

भाजप नेते परिणय फुके यांच्या वक्तव्यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र परिणय फुके यांनी केवळ शिवसेनेचा उल्लेख केला आहे. शिवसेनेतील ठाकरे गट किंवा शिंदे गट याबाबत त्यांनी कोणताही उल्लेख केलेला नाही. यावर आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले की, परिणय फुके काय बोलले आणि कुठल्‌या शिवसेनेबाबत बोलले ते मला माहीत नाही. मला फार काही बोलायचं नाही, असे अंबादास दानवे म्हणाले आहेत.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

यावर शिंदे गटाचे नेते व मंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आङे. दीपक केसरकर म्हणाले की, एखाद्याच्या विधानाला पक्षाचं विधान म्हणून बघता कामा नये. परिणय फुके माझे मित्रच आहेत. पण लोकांची सेवा कशी होईल ते पाहिलं पाहिजे. दरम्यान परिणय फुकेंनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे. स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ही मागणी केली आहे.

Web Title: Bjp parinay phuke on shivsena controversial statement maharashtra political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2025 | 03:32 PM

Topics:  

  • political news

संबंधित बातम्या

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी
1

‘मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या’; एकनाथ शिंदेंच्या ‘या’ आमदाराची जाहीरपणे नाराजी

राज्यातील तब्बल 2.07 कोटी मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचंही नाव नसेल तर ‘हे’ नक्की करा…
2

राज्यातील तब्बल 2.07 कोटी मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचंही नाव नसेल तर ‘हे’ नक्की करा…

‘जात पडताळणी समिती रद्द केली तर…’; छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध
3

‘जात पडताळणी समिती रद्द केली तर…’; छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध

चाफ्याच्या फुलाने राजकीय ‘गुलदस्ता’; उदयनराजे-रामराजेंच्या भेटीने जिल्हा बँक सभेला रंग
4

चाफ्याच्या फुलाने राजकीय ‘गुलदस्ता’; उदयनराजे-रामराजेंच्या भेटीने जिल्हा बँक सभेला रंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.