Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP-Shiv Sena Conflict : भाजप-शिवसेना संघर्ष तीव्र ! नगरसेवक निवडीवरून भाजप आक्रमक, युतीतून बाहेर पडण्याची घोषणा

BJP-Shiv Sena Conflict : उल्हासनगर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. शिवसेनेचे 5 आणि भाजपचे 2 स्वीकृत नगरसेवक निवडून आल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 03, 2026 | 06:54 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • खासदार श्रीकांत शिंदे यांना कोणत्याही निवडणुकीत सहकार्य नाही  
  • हे प्रकरण न्यायालयात नेण्याची भूमिका   
  • कमलेश निकम यांच्यावरही तीव्र शब्दांत टीका 
BJP-Shiv Sena Conflict : उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेत ( एकनाथ शिंदे गट )  तिव्र संघर्ष पाहण्यास मिळत आहे. उल्हासनगर महानगरपालिकेतील निवडणुकी वरुन हा सत्ता संघर्ष पाहण्यास मिळत आहे. या  स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून आता भाजप आणि शिवसेने मध्ये राजकीय संघर्ष अधिकचं तीव्र झाल्याचे दिसत आहे. महानगरपालिकेसाठी 07 स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे गट )  05 नगरसेवक तर भाजपचे 02 नगरसेवक निवडून आल्यानंतर भाजपने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेतील सत्ताधारी असलेला भाजप पक्ष  महानगरपालिकेच्या निवडणुकीतून आणि युतीतून बाहेर पडण्याची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांना कोणत्याही निवडणुकीत सहकार्य नाही

भाजपचे आमदार कुमार आयलानी आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी या पत्रकारपरिषदेत आपली आणि आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली; या पत्रकारपरिषदेत भाजपचे आमदार कुमार आयलानी आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना कोणत्याही निवडणुकीत सहकार्य करणार नाही. अशी स्पष्ट भूमिका भाजपने जाहीर केली आहे.

Mira Bhayandar News: रुग्णालयात उपचारासाठी आले, पण लिफ्टच बंद! पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील गैरसोयींमुळे नागरिक हैराण

हे प्रकरण न्यायालयात नेण्याची भूमिका

या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीदरम्यान भाजपच्या 04 पैकी 02 उमेदवारांचे अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद झाले होते. त्यानंतर भाजपच्या जागांवर पर्यायी उमेदवारांच्या निवडीवरूनही वाद निर्माण झाला होता. शेवटी शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे गट )  05 आणि भाजपचे 02 उमेदवार स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडले गेले होते.  या प्रक्रियेवर भाजपने आक्षेप घेतला आहे.  तर हे प्रकरण न्यायालयात नेण्याची भूमिकाही जाहीर करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे उल्हासनगर महापालिकेतील भाजप आणि शिवसेना यांच्या संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.

कमलेश निकम यांच्यावरही तीव्र शब्दांत टीका

या पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांनी महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम यांच्यावरही तीव्र शब्दांत टीका केली आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीपासून सुरू झालेला हा वाद आता थेट युतीच्या भवितव्यापर्यंत पोहोचला आहे. तर भाजप आणि शिवसेनेच्या ( एकनाथ शिंदे गट ) युती मध्ये फूट पटण्याची शक्याता दिसून येत आहे.भाजपच्या या आक्रमक भूमिकेमुळे उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उल्हासनगरच राजकारणात आता चर्चेत आहे. तर येणाऱ्या निवडणुकीत पुढील काळात काय घडते आहे. या कडे सर्वांचे लक्ष आहे.

Pradeep Purnekar Murder Case : सुषमा अंधारेंनी मीनाक्षी शिंदेंवर थेट सवाल केले उपस्थित, ‘पाच कोटींचा व्यवहार, 15 दिवसांपासून रेकी’

Web Title: Bjp shiv sena conflict ulhasnagar shrikant shinde election alliance sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 06:54 PM

Topics:  

  • Dr Shrikant shinde
  • Ulhasnagar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.