Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामती पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; मतदान केंद्रांवरील सुविधांकडे दिलं जातंय लक्ष

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, तसेच सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश त्यांनी दिले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 04, 2026 | 12:18 PM
बारामती पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे भान ठेवण्याचे निर्देश

बारामती पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे भान ठेवण्याचे निर्देश

Follow Us
Follow Us:

पुणे : बारामती विधानसभा पोटनिवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर नियुक्त नोडल अधिकारी व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निवडणूक कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी नव्या प्रशासकीय भवनातील सभागृहात आढावा बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, तसेच सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश त्यांनी दिले. आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला. नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असून, प्राप्त तक्रारींची तात्काळ नोंद घेऊन त्यांचे निवारण करावे. ‘सी-व्हिजिल’ ॲपवरील तक्रारींवर १०० मिनिटांत कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले. राजकीय पक्षांच्या सभा, रॅली व फलकांसाठी एकखिडकी कक्षातून परवानग्या देताना आवश्यक कागदपत्रांची तपासणी करावी, असेही सांगण्यात आले.

परिवहन विभागाने वाहनांची तपासणी करताना आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच एसएसटी, एफएसटी, नियंत्रण कक्ष व एक खिडकी कक्षातील नोडल अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत विशेष सूचना देण्यात आल्या.

मतदान केंद्रांवरील सुविधांकडे लक्ष

मतदान केंद्रांवर मतदारांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. केंद्रांवर फर्निचर, रॅम्प, वीज, पिण्याचे पाणी, शौचालय यांसह स्वच्छतेची योग्य व्यवस्था असल्याची खात्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीस सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार स्वप्नील रावडे, गटविकास अधिकारी किशोर माने यांच्यासह विविध विभागांचे नोडल अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

दोन्ही मतदारसंघांत निवडणूक लढवण्याचा काँग्रेसचा निर्धार

बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने दोन्ही मतदारसंघांत निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. पक्षश्रेष्ठींकडून यासाठी हिरवा कंदील मिळाल्याची माहिती समोर आली असून, महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेदेखील वाचा : बारामती पोटनिवडणुकीवरून राजकारण चांगलंच तापणार; महाविकास आघाडीत फूट पडणार? आता अंतिम निर्णय…

Web Title: Administration ready for baramati by election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • Baramati by-election
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

नाशिकमध्ये महाजन, सामंतांचे प्रयत्न निष्फळ; शेवटी शिंदेंना दणका,  छुप्या रणनीतीचा वापर करत गोकुळ गिते विजयी
1

नाशिकमध्ये महाजन, सामंतांचे प्रयत्न निष्फळ; शेवटी शिंदेंना दणका, छुप्या रणनीतीचा वापर करत गोकुळ गिते विजयी

Top Marathi News Today Live : बंडखोर खासदार आष्टीकरांच्या मुलाची ठाकरे गटातून हकालपट्टी
2

Top Marathi News Today Live : बंडखोर खासदार आष्टीकरांच्या मुलाची ठाकरे गटातून हकालपट्टी

‘माझ्या पक्षाचे खासदार निवडून आले नाहीत, हेच बरे’; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
3

‘माझ्या पक्षाचे खासदार निवडून आले नाहीत, हेच बरे’; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Politics : ठाकरे गटाच्या खासदारानंतर आता आमदारही फुटणार? आमदाराने नेमकं काय म्हटलं…
4

Maharashtra Politics : ठाकरे गटाच्या खासदारानंतर आता आमदारही फुटणार? आमदाराने नेमकं काय म्हटलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.