Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara ZP Politics: साताऱ्यात लोकशाहीचा गळा घोटला? जिल्हा परिषदेत काळ्या फिती लावून महाविकास आघाडीचा एल्गार

सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीनंतर राजकारण तापलं आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर मंत्री मकरंद पाटील यांनी भाजपला थेट आव्हान दिलं असून, शंभूराज देसाई यांनीही 20 मार्चच्या घटनांवरून संताप व्यक्त केला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 04, 2026 | 04:40 PM
Satara ZP Election 2026, BJP Strategy Satara, NCP Rebellion Satara,

Satara ZP Election 2026, BJP Strategy Satara, NCP Rebellion Satara,

Follow Us
Follow Us:
  •   सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीनंतर राजकारण तापलं
  • राष्ट्रवादीतील फुटीनंतर मंत्री मकरंद पाटील यांनी भाजपला थेट आव्हान
  • काळ्या फिती बांधून सदस्यांनी निषेध नोंदवत “लोकशाहीचा गळा घोटला जात आहे” अशा घोषणा
 

Satara ZP:  सातारा जिल्हा परिषदेत सभापती पदांच्या निवडीनंतर राजकीय वातावरण प्रचंड तापले असून, विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. भारतीय जनता पार्टीच्या चार सभापती निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनामध्ये झालेल्या कथित फुटीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले.

“सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीनंतर राजकारण तापलं आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर मंत्री मकरंद पाटील यांनी भाजपला थेट आव्हान दिलं असून, शंभूराज देसाई यांनीही 20 मार्चच्या घटनांवरून संताप व्यक्त केला आहे.”

सभापती निवडीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, शेतकरी संघटना आणि अपक्ष सदस्यांनी एकत्र येत निवडणुकीवर बहिष्कार टाकला. काळ्या फिती बांधून सदस्यांनी निषेध नोंदवत “लोकशाहीचा गळा घोटला जात आहे” अशा घोषणा देत प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. पत्रकार परिषदेत बोलताना मकरंद पाटील यांनी थेट इशारा देत म्हटले, “राजकारणात आमचे सदस्य फोडण्याची सुरुवात त्यांनी केली आहे, पण शेवट आम्ही करणार. आम्ही काल-परवा राजकारणात आलेलो नाही. आमच्या पन्नास वर्षांच्या पिढ्या या राजकारणात काम करत आहेत.”

Satara Politics: साताऱ्यात भाजपचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! राष्ट्रवादीला मोठे खिंडार; सभापती निवडीत ‘बॅकूम स्ट्रॅटेजी’ यशस्वी

पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना यांनी एकत्र येत सभागृहात प्रश्न उपस्थित केले असून, कराडमध्ये सर्वपक्षीय निषेध नोंदवण्यात आला आहे. “ही केवळ एका पक्षाची लढाई नसून लोकशाही वाचवण्याची लढाई आहे.” दरम्यान, संदीप मांडवे आणि अनिल देसाई यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात न्यायालयात दाद मागितल्याचे सांगत, “कोर्टाने प्रशासनावर ओढलेले ताशेरे हा आमचा नैतिक विजय आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

याच वेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. “20 मार्च रोजी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीदरम्यान जे प्रकार घडले ते अत्यंत गंभीर होते. भाजपने बळाचा आणि दांडीलशाहीचा वापर करून निवडणूक पार पाडली,” असा आरोप त्यांनी केला.

शंभुराज देसाई म्हणाले, “साताऱ्यासारख्या जिल्ह्यात पहिल्यांदाच सदस्यांना हाताला काळ्या फिती बांधून निषेध करावा लागत आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. सदस्यांवर अन्याय झाला तर आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू आणि हा लढा सुरूच ठेवू.” दरम्यान, 20 मार्चच्या घटनांचा निषेध करत विरोधी सदस्यांनी सभागृहासमोर काळ्या फिती बांधून आंदोलन केले. या घटनांमुळे साताऱ्यातील जिल्हा परिषद राजकारणात मोठी खळबळ उडाली असून सत्ताधारी आणि विरोधकांतील संघर्ष उघडपणे समोर आला आहे.

पिंपरी-चिंचवड शिवसेनेची कार्यकारिणीच बरखास्त; कामचुकार पदाधिकाऱ्यांची आता गय नाही

राजकीय विश्लेषकांच्या मते, या संघर्षाचे पडसाद आगामी निवडणुकांवर उमटण्याची शक्यता असून साताऱ्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. विरोधकांनी दिलेला इशारा आणि सत्ताधाऱ्यांची भूमिका यामुळे येत्या काळात हा संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

 

 

Web Title: Black ribbon protest in satara ncp shiv sena boycott zp polls allegations of democracy murder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • BJP Politics
  • NCP Politics
  • Satara ZP Election

संबंधित बातम्या

Vinod Tawade Special:  भाजपचे छुपे चाणक्य..! विनोद तावडे कसे बनले भाजपचे प्रमुख निवडणूक रणनीतीकार
1

Vinod Tawade Special: भाजपचे छुपे चाणक्य..! विनोद तावडे कसे बनले भाजपचे प्रमुख निवडणूक रणनीतीकार

Satara News : राहुल माने यांची भाजप किसान मोर्चा तालुकाध्यक्षपदी निवड
2

Satara News : राहुल माने यांची भाजप किसान मोर्चा तालुकाध्यक्षपदी निवड

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
3

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.