Satara Politics: साताऱ्यात भाजपचा 'सर्जिकल स्ट्राईक'! राष्ट्रवादीला मोठे खिंडार; सभापती निवडीत 'बॅकूम स्ट्रॅटेजी' यशस्वी
भाजपने या निवडणुकीत आक्रमक प्रचार किंवा उघड राजकीय हालचाली टाळून, आतल्या गाठींचे राजकारण (backroom strategy) वापरले.
विरोधकांमध्ये संभ्रम निर्माण करणे, काही सदस्यांना आपल्या बाजूला वळवणे, निवडणूक टाळून बिनविरोध विजय मिळवणे, या तिन्ही पातळ्यांवर भाजप यशस्वी ठरल्याचे दिसते.
Pune Railway Revenue : पुणे रेल्वे विभागाची मोठी झेप; महसूल, प्रवासी सेवा आ
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उघड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महत्त्वाच्या सदस्यांनी थेट भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) उमेदवारी अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या धक्कादायक निर्णयामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर आली आहे.
हे दोन्ही सदस्य गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या धोरणांवर नाराज असल्याची चर्चा होती. स्थानिक नेतृत्वावर असलेला अविश्वास हे या पक्षांतराचे मुख्य कारण मानले जात आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत सत्तेच्या समीकरणांशी जुळवून घेण्यासाठी या सदस्यांनी भाजपचा हात धरल्याचे बोलले जात आहे. या अनपेक्षित घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा पेच निर्माण झाला असून, आगामी निवडणुकांमध्ये याचे काय परिणाम होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडल्याचे मानले जात आहे.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेने काळ्या पट्ट्या बांधून निषेध नोंदवला असला, तरी मतदानावर बहिष्कार हा निर्णय राजकीयदृष्ट्या ‘डबल-एज्ड’ ठरू शकतो.एकीकडे नैतिक भूमिका अधोरेखित होतेपण दुसरीकडे प्रत्यक्ष सत्ता भाजपकडे जाते
यामुळे विरोधकांनी संघर्षाऐवजी माघार घेतल्याची टीकाही होत आहे.
अमरावतीकरांचे २.१७ लाखांचे दरडोई उत्पन्न! मात्र महागाईसमोर हतबल; उद्योगअभावी अर्थव्यवस्था
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे संकेत आहेत.राष्ट्रवादी व शिवसेनायांच्या सदस्यांनी भाजपने फोडाफोडीचे राजकारण केल्याने काळ्या पट्ट्या बांधून निषेध केला .तसेच मतदानावर बहिष्कार टाकल्याची माहिती समोर येत होती सातारा जिल्हा परिषदेच्या राजकारणात भाजपने पुन्हा एकदा दबाव तंत्र आणि चाणक्य नीति वापरून आपला वर्चस्व प्रभाव दाखवून दिला त्यांच्या वक्तव्यावरून, सत्ताधारी गटाची पुढील दिशा आणि विरोधकांवरील राजकीय दबावया दोन्ही बाबी स्पष्ट होणार आहेत.
संभाव्य तणाव लक्षात घेता, जिल्हा परिषद आवारात 100 मीटर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावरून प्रशासनाने परिस्थितीची गंभीरता ओळखल्याचे दिसते.
भाजपने संघटन + रणनीती यावर भर देत सत्ता मजबूत केली
विरोधकांमध्ये एकजूट आणि स्पष्ट दिशा अभावाने दिसली
क्रॉसओव्हरमुळे पारंपरिक राजकीय निष्ठा ढासळत असल्याचे संकेत
राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला होता. प्रशासनाच्या वतीने प्रत्येक सदस्यांची दोन वेळा झडती घेण्यात आली. त्यामुळे त्यांना मतदान प्रक्रियेसाठी वेळेवर पोहोचता आले नाही. तसेच त्यांचे मोबाईल सुद्धा काढून घेण्यात आले होते .प्रशासनाने मुद्दाम आम्हाला उशीर व्हावा या दृष्टीने नियोजन केले होते त्याचा आम्हाला फटका बसला असून भाजपचे दडपशाहीचे हे राजकारण आम्ही चालू देणार नाही, असे म्हणून राष्ट्रवादीच्या व शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात काळ्याफिती बांधून शेवटी प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराच्या पायरीवर बसून धरणे आंदोलन केले. यापुढे कोण कोणाला भारी पडतो, हे आम्ही आता भाजपला दाखवून देऊ असा इशारा राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेला आहे, त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या राजकारणात पुढील पाच वर्ष छुपा अजेंडा पाहायला मिळणार आहे.






