Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ritu Tawde Controversy : मुंबईच्या महापौर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; रितू तावडे यांचा लाल दिव्याच्या गाडीतून प्रवास

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत गाडीवर लावलेल्या लाल आणि निळ्या दिव्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियामधून जोरदार टीका केली जात आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 15, 2026 | 02:01 PM
BMC Mayor Ritu Tawde Red blue light Red-Beacon Car Controversy marathi news

BMC Mayor Ritu Tawde Red blue light Red-Beacon Car Controversy marathi news

Follow Us
Follow Us:
  • मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात
  • रितू तावडे यांची लाल दिव्यांची गाडी
  • मुंबईच्या महापौरांच्या लाल दिव्यांच्या गाडीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
Ritu Tawade Red-Beacon Car : मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकल्या आहेत. मुंबईच्या (Mumbai News) नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला. त्यांच्या नव्या अधिकृत गाडीवर लावलेल्या लाल आणि निळ्या दिव्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियामधून जोरदार टीका केली जात आहे. यापूर्वी घड्याळ्यामुळे वादात अडकलेल्या रितू तावडे (BMC Mayor) आता गाडीवर दिव्यांमुळे चर्चेत आल्या आहेत.

केंद्र सरकारने २०१७ मध्ये सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा, नामफलक, ध्वज किंवा अधिकार दर्शवणारी चिन्हे लावण्यास बंदी घातली होती. त्यानंतर देखील मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या गाडीला लावलेले लाल-निळे दिवे पाहून सर्वांनी आश्यर्च व्यक्त केले आहे. तसेच नियम फक्त इतर लोकांसाठी आहेत का असा संतप्त सवाल देखील उपस्थित केला आहे. याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. तसेच या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे देखील वाचा : “मी तुझ्या आईला मारलं” मुलाला व्हिडिओ कॉलवर सांगितलं; बाटलीने मारहाण करून ओढणीने गळा आवळत पत्नीची हत्या

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या गाडीवरील दिव्यांमुळे व्हीआयपी ट्रीटमेंट पुन्हा सुरु झाली असल्याची टीका केली जात आहे. मुंबई पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन रोष व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, नियमांना ब्रेक आणि महापौरांच्या गाडीला झगमगाट, मुंबईत व्हीआयपी संस्कृतीची पुन्हा एन्ट्री? दोन दिवसांपूर्वीच महापौर मॅडम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या जीआर ला दिलेल्या सूचनेला हरताल फसला. आता तर केंद्रसरकार यांनी दिलेला निर्णयाला हरताल फसला आहे. व्हीआयपी संस्कृती पंतप्रधान मोदी केंद्र सरकार यांनी संपवली होती पण मुंबईच्या महापौरा यांना व्हीआयपी संस्कृतीचा मोह टाळता आला नाही पंतप्रधान मोदी केंद्र सरकारचे निर्णय महापौर पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का ?? असा प्रश्न किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.

हे देखील वाचा : आसाम, बंगालसह पाच राज्यांमध्ये वाजणार निवडणूकीचा बिगुल; 4 वाजता जाहीर होणार तारखा

या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मी त्याची माहिती घेतली. लाल दिवा गाडीवर वैगरे नव्हता. पण बोनेटच्या ठिकाणी लाल दिवा होता. त्याच्यामध्ये महापौरांचा काहीच दोष नाहीये. त्या संदर्भात राज्यामध्ये कोणीही लाल दिवे वापरु नयेत हा जुनाच आपला नियम आहे. त्यामुळे महापौरांना त्याची कल्पना आहे. मला असे वाटतय की त्यांना विनाकारण टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारे टार्गेट करणे योग्य नाही.”अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देत मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: Bmc mayor ritu tawde red blue light red beacon car controversy marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 01:48 PM

Topics:  

  • BMC Mayor
  • devendra fadnavis
  • Mumbai News
  • Ritu Tawde

संबंधित बातम्या

‘कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही,’ मनोज जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
1

‘कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही,’ मनोज जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर

गणेशोत्सवातून ‘ड्रग्स फ्री मुंबई’चा संदेश द्या; गणेश मंडळांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन
2

गणेशोत्सवातून ‘ड्रग्स फ्री मुंबई’चा संदेश द्या; गणेश मंडळांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन

Blinkit च्या मालाड गोदामावर FDA चा छापा; फूड लायसन्स निलंबित, कारवाईने खळबळ
3

Blinkit च्या मालाड गोदामावर FDA चा छापा; फूड लायसन्स निलंबित, कारवाईने खळबळ

McDowell’s-Old Monk प्रकरणात FSSAI अडचणीत? हायकोर्टाने उपस्थित केला लेबलिंगचा मुद्दा
4

McDowell’s-Old Monk प्रकरणात FSSAI अडचणीत? हायकोर्टाने उपस्थित केला लेबलिंगचा मुद्दा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.