Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यावर प्रश्नचिन्ह; भाजपमध्येच पवारविरोधी गट ‘अ‍ॅक्टिव्ह’

भाजप आमदार गोपीचंद पडळकर या घडामोडीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. पडळकर स्वतः निवडणूक लढवणार नसले तरी, धनगर समाजाच्या एखाद्या स्वतंत्र उमेदवाराला पाठिंबा देऊन सुनेत्रा पवार यांच्यासमोर आव्हान उभे करू शकतात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 17, 2026 | 09:28 AM
बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यावर प्रश्नचिन्ह; भाजपमध्येच पवारविरोधी गट ‘अ‍ॅक्टिव्ह’
Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर होताच राज्यातील राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन केले. मात्र, एका सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या नामकरणावरून निर्माण झालेल्या वादाने या आवाहनावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालया’चे नाव बदलून त्याला अजित पवार यांचे नाव देण्याच्या निर्णयामुळे धनगर समाजात संताप वाढला आहे. विविध संघटनांनी याला अहिल्यादेवींच्या वारशाचा अपमान असल्याचे सांगत विरोध दर्शवला. यामुळे बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळताना दिसत आहे. याच काळात भाजपमधील पवार-विरोधी गटही सक्रिय झाला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर या घडामोडीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. पडळकर स्वतः निवडणूक लढवणार नसले तरी, धनगर समाजाच्या एखाद्या स्वतंत्र उमेदवाराला पाठिंबा देऊन सुनेत्रा पवार यांच्यासमोर आव्हान उभे करू शकतात. बारामतीत धनगर मतदारांची संख्या १५ ते २० टक्के असल्याने राजकीय समीकरणे बदलू शकतात.

हेदेखील वाचा : Baramati by-election : “वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर…; बारामती पोटनिवडणूकीवर रोहित पवारांची भावनिक पोस्ट

धनगर समाजाच्या नाराजीमुळे बारामतीची पोटनिवडणूक त्रिकोणी किंवा बहुकोणी होण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार प्रबळ उमेदवार मानल्या जात असल्या, तरी विरोध वाढल्यास विजयाचा फरक कमी होऊ शकतो. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ येत असताना बारामतीतील राजकीय हालचाली अधिक वेगवान होण्याची चिन्हे आहेत.

सुनेत्रा पवारांविरुद्ध उमेदवार नाही

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांचा पक्ष बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार उभा करणार नाही. निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार, बारामती आणि राहुरी येथे २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीची जागा रिक्त झाली असून, तिथून सुनेत्रा पवार निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

राहुरीच्या जागेबाबत लवकरच निर्णय घेणार

सुप्रिया सुळे दिल्लीत पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, मी आधीच स्पष्ट केले आहे की, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष बारामतीची पोटनिवडणूक लढणार नाही. आम्ही सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उमेदवार देणार नाही. राहुरीच्या जागेबाबत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांशी चर्चा करून येत्या काही दिवसांत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Chances of baramati by election being uncontested are less

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 09:28 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Baramati by-election
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
1

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
2

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
3

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
4

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.