Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘देवेंद्र फडणवीसांकडे दैवी शक्ती, ते सर्वगुणसंपन्न’, चंद्रकांत पाटील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांवर कौतुकांचा वर्षाव

पुण्यातील 'देवभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत त्यांना दैवी शक्ती लाभल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 02, 2026 | 05:48 PM
'देवेंद्र फडणवीसांकडे दैवी शक्ती, ते सर्वगुणसंपन्न', चंद्रकांत पाटील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांवर कौतुकांचा वर्षाव

'देवेंद्र फडणवीसांकडे दैवी शक्ती, ते सर्वगुणसंपन्न', चंद्रकांत पाटील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांवर कौतुकांचा वर्षाव

Follow Us
Follow Us:
  • चंद्रकांत पाटील म्हणाले, फडणवीसांना दैवी शक्ती लाभली आहे.
  • कर्जमाफी, मराठा आरक्षण आणि निर्णयक्षमतेचे केले कौतुक
  • पुण्यातील ‘देवभाऊ’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात वक्तव्य
 

भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी केलेल्या एका वक्तव्याची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पुण्यात आयोजित ‘देवभाऊ’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी फडणवीस यांना “दैवी शक्ती लाभली आहे” असे संबोधत त्यांच्या नेतृत्वशैलीचे आणि निर्णयक्षमतेचे कौतुक केले.

आपल्या भाषणात चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस यांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत सांगितले की, वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी ते महापौर झाले आणि पुढे राज्य महापौर परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. स्वतःची प्रकृती ठीक नसतानाही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा उल्लेख करत त्यांनी फडणवीस यांच्याविषयीचा आदर व्यक्त केला.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, “देवेंद्र फडणवीसांना दैवी शक्ती लाभली आहे. ते सर्व बाबतीत सर्वगुणसंपन्न आहेत. अनेक मुख्यमंत्री पाहिले, मात्र फडणवीस यांच्यासारखी निर्णयक्षमता क्वचितच पाहायला मिळते.” त्यांनी पुढे असा दावाही केला की, फडणवीस अनेक महत्त्वाच्या विकासकामांवरील प्रस्तावांवर तत्काळ निर्णय घेतात आणि निधी मंजुरीसारख्या प्रक्रियेतही विलंब होऊ देत नाहीत.

भुजबळ – महाजनांमध्ये अबोला? गिरीश महाजनांबाबतच्या चर्चांवर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण, नाशिकच्या रस्त्यांच्या अवस्थेवरून मोठे विधान

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस यांचे समर्थन केले. त्यांनी म्हटले की, मराठा आरक्षणासाठी आवश्यक असलेला अभ्यास आणि कायदेशीर तयारी फडणवीस यांनी केली होती, त्यामुळे ते उच्च न्यायालयात टिकू शकले. मात्र, पुढील काळात परिस्थिती बदलल्याने आरक्षण कायम राहू शकले नाही. याबाबत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका न करता, कोविड महामारीमुळे त्या काळात वेगळ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या, असे मत व्यक्त केले.

कर्जमाफीच्या निर्णयाचाही उल्लेख करत त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी फडणवीस यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. पहाटेपर्यंत बैठका घेऊन धोरणे अंतिम करण्याची त्यांची कार्यपद्धती इतर मुख्यमंत्र्यांपेक्षा वेगळी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महायुतीत वाढणार संघर्ष? क्लस्टर योजनेवरून गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा

यापूर्वी दिल्लीतील आंदोलनस्थळी पोलिसांकडून दगडांवरील फिंगरप्रिंट तपासले जात असल्याच्या त्यांच्या विधानावरून विरोधकांनी टीका केली होती. त्यानंतर आता फडणवीसांना “दैवी शक्ती” लाभल्याच्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Chandrakant patil divine power statement on devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 05:48 PM

Topics:  

  • chandrakant patil
  • DCM Devendra Fadnavis
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार
1

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
2

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
3

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन
4

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.