Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन

Maharashtra Cabinet Decisions: या आर्थिक मदतीमुळे २०२५-२६ च्या गाळप हंगामातील उर्वरित एफआरपीची रक्कम चुकती करणे आणि आगामी २०२६-२७ च्या गाळप हंगामाची पूर्वतयारी सुरळीत करणे शक्य होणार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 16, 2026 | 08:53 AM
Maharashtra Cabinet Decisions, Devendra Fadnavis

Maharashtra Cabinet Decisions, Devendra Fadnavis

Follow Us
Follow Us:
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य कॅबिनेट बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
  • सहकारी साखर कारखान्यांना थकीत एफआरपी (FRP) देण्यासाठी शासनाकडून ‘सॉफ्ट लोन’
  • २०२५-२६ च्या गाळप हंगामात ९९.२६ टक्के (४०,१४८ कोटी रुपये) एफआरपी शेतकऱ्यांना वितरित
Maharashtra Cabinet Decisions: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखाने आणि सामान्य नागरिकांसाठी संबंधित सात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. २०२५-२६ च्या हंगामातील ऊस थकीत एफआरपी शेतकऱ्यांना मिळावी यासाठी सहकारी साखर कारखान्यांना सुलभ अटींवर कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर सरकारच्या २५ महत्त्वाच्या योजना आणि २५ धोरणांचा प्रत्यक्ष नागरिकांना किती फायदा होतो, याची तपासणी करण्यासाठी ‘महा-टॅक’ सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली.

राज्यात सरासरीपेक्षा 16.5 टक्के कमी पाऊस; खरीप पिकांना निर्माण झाला धोका

गाळप हंगामासाठी आर्थिक सहाय्य

सहकारी साखर कारखान्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी शासन ‘सॉफ्ट लोन देणार आहे. २०२५-२६ च्या गाळप हंगामातील थकीत एफआरपी देण्यासाठी आणि आगामी २०२६-२७ च्या गाळप हंगामाची पूर्वतयारी सुरळीत पार पाडण्यासाठी हे आर्थिक सहाय्य महत्वाचे ठरणार आहे.

२०२५-२६च्या हंगामात राज्यातील २१० साखर कारखान्यांनी १,०४५.६३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले. या ऊसासाठी शेतकऱ्याना एकूण ४०,४४६ कोटी एफआरपी देणे अपेक्षित होते. १५ जूनपर्यंत त्यापैकी ४०,०५० कोटी, म्हणजेच ९९.०२ टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली. ३० जूनपर्यंत ही रक्कम ४०,१४८ कोटी झाली. म्हणजेच ९९.२६ टक्के एफआरपी शेतक-यांना मिळाली.

‘कोर्टाच्या विरोधात गेलात तर मराठा समाजाचंच नुकसान’; मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर फडणवीसांचा मोठा

२५ महत्वाच्या धोरणांचा केला जाणार अभ्यास

दरवर्षी शासकीय योजनांवर मोठा पैसा खर्च केला जातो. मात्र या योजनांचा प्रत्यक्ष नागरिकांना किती फायदा झाला, हे तपासण्यासाठी ‘महाराष्ट्र तांत्रिक सहाय्यता कक्ष’ अर्थात ‘महा-टॅक’ सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. भारतीय व्यवस्थापन संस्था, मुंबई आणि ‘सेंटर फॉर रिसर्च इन स्कीम्स अँड पॉलिसीज’ यांच्या सहकार्याने हे काम केले जाणार आहे, सरकारच्या २५ प्रमुख योजना आणि २५ महत्वाच्या धोरणांचा अभ्यास केला जाणार आहे. यामध्ये केवळ सरकारी कागदपत्रे पाहिली जाणार नाहीत, तर प्रत्यक्ष लाभाव्यांशी बोलून माहिती घेतली जाणार आहे.

इतर महत्त्वाचे निर्णय

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिक शाखेला अभ्यासिका व वाचनालयाच्या भाडेपट्टा करारनामा नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क माफ, नाशिक महापालिकेच्या इमारतीसाठी हा निर्णय लागू असेल

वर्धा जिल्ह्यातील आर्थी नगरपरिषदेला व्यापारी संकुल उभारण्यासाठी ६,२४०,३० चौ. मी. शासकीय जागा विनामूल्य हस्तांतरित करण्यास मंजुरी

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करणार.

 

 

Web Title: Maharashtra cabinet decisions devendra fadnavis soft loan sugar factories maha tac cell

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 08:53 AM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Politics
  • Marathi News
  • Sugar Factory

संबंधित बातम्या

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?
1

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?

Global Economy : अमेरिकेच्या बॉन्ड बाजारात भूकंप! २००७ नंतर पहिल्यांदाच यिल्ड ५ टक्क्यांवर
2

Global Economy : अमेरिकेच्या बॉन्ड बाजारात भूकंप! २००७ नंतर पहिल्यांदाच यिल्ड ५ टक्क्यांवर

Israel Election : युद्धाच्या सावटात इस्रायलमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम; नेतन्याहूंची पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारी
3

Israel Election : युद्धाच्या सावटात इस्रायलमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम; नेतन्याहूंची पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारी

Yemen War : पळायचं कुठे? पुढे गोळ्या, मागे गोळ्या; १.२५ लाख येमेनी नागरिक संकटात
4

Yemen War : पळायचं कुठे? पुढे गोळ्या, मागे गोळ्या; १.२५ लाख येमेनी नागरिक संकटात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.